पुणे – एकीकडे काँग्रेस -राष्ट्रवादी ने शहरात पाकिस्तान आणि दहशवादी कारवाया च्या विरोधात निदर्शने करताना मोदी सरकारलाही लक्ष्य केले असताना भाजयुमो ने पुण्यातील साथीच्या आजारावर महापौरांना लक्ष्य केले.. आणि महापौरांचे करायचे काय खाली डोके वर पाय … अशा घोषणा देत महापालिकेत धुर फवारणी करीत गोंधळ घातला . भाजयुमो ला जर एवढीच काळजी होती तर त्यांनी शहर स्वच्छ करून शंभर फवारणी करायला हवी होती असा यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेस ने पवित्रा घेतला .
सध्या डेंगू, चिकन गुनिया, मलेरिया सारख्या साथीच्या आजाराने पुणे शहरात थैमान घातले आहे, पुण्याचे महापौर आणि मनपा आरोग्य अधिकारी साथीचे आजार नियंत्रणात आणण्यात पूर्णतः अपयशी ठरले असा आरोप करीत याविरोधात भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहराच्या वतीने हे आंदोलन केले .आम्ही राजकारण करीत नसून या गंभीर प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करण्याकरिता महापौर आणि आरोग्य अधिकारी यांना जाग येण्याकरिता हे आंदोलन केले असे भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहराच्या वतीने अध्यक्ष दीपक पोटे यांनी सांगितले