पुणे, २१ सप्टेंबर २०१६ : पुणेस्थित ‘ए. के. एज्युकेशनल कन्सल्टंट्स’ने (एकेईसी) रशियाच्या ‘कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी’शी असलेल्या सहयोगाची दशकपूर्ती नुकतीच तेथे अभिमानाने साजरी केली.‘एकेईसी’ची स्थापना वर्ष २००७ मध्ये संस्थापक संचालक डॉ. अमित कामले, एम. डी (रशिया) यांनी केली. भारतीय विद्यार्थ्यांना रशियातून दर्जेदार उच्च शिक्षण घेण्यासाठीचा उत्तम मार्ग ही संस्था पुरवत आहे. अन्य अनेक युरोपीय देश व अमेरिकेच्या तुलनेत रशियातील हे उच्च शिक्षण अत्यंत किफायती आहे. त्याचबरोबर रशियातील पदव्यांना जगभर मान्यता आहे. त्यामुळे त्यामुळे रशियन सरकारी वैद्यकीय विद्यापीठातून ‘डॉक्टर ऑफ मेडिसीन’ ही पदवी घेतलेला विद्यार्थी भारतात ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली’च्या वतीने ‘नॅशनल बोर्ड ऑफ एक्झॅम्स’ची निवड चाचणी उत्तीर्ण होऊन भारतात प्रॅक्टिस करु शकतो व उच्च पातळीवर कारकीर्द सुरु करु शकतो.
याप्रसंगी बोलताना ‘कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी’चे रेक्टर प्रा. अलेक्सी सोझिनोव्ह म्हणाले, की ‘ए. के. एज्युकेशनल कन्सल्टंट्स’ ही गेल्या दहा वर्षांपासून आमची अत्यंत भरवशाची सहयोगी संस्था आहे. भविष्यात अनेक वर्षे हे सहकार्य सुरु ठेवणे आम्हाला आवडेल. भारतीय बाजारपेठेत आणि जगभर आमच्या युनिव्हर्सिटीचा नावलौकिक व गौरव प्रस्थापित करण्यात डॉ. अमित कामले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते कामात अत्यंत वक्तशीर व शिस्तीचे असल्यानेच इतरांच्या तुलनेत स्वतंत्र स्थान मिळवून राहिले आहेत.
व्हाईस रेक्टर प्रा. लायसान मुखाऱ्यामोव्हा यांनीही या कौतुकाला दुजोरा दिला. ते म्हणाले, की डॉ. अमित कामले या युनिव्हर्सिटीच्या कार्यचौकटीशी संबंधित सेवांबाबत अतिशय जागरुक असतात. विद्यार्थ्यांच्या कल्याणावर त्यांचा जास्त भर असतो. त्यांनी आजवर ४५० भारतीय विद्यार्थ्यांना आमच्या युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळवून दिला आहे. त्यांच्या सहयोगाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. त्यांच्यातील आवडता गुण म्हणजे त्यांनी विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा दर्जाला प्राधान्य दिले आहे.
डीन (अधिष्ठाता) डॉ. एलेना कोश्पेव्हा म्हणाल्या, की डॉ. अमित हे माझ्यासाठी कुटूंबातील सदस्याप्रमाणेच आहेत. सुख-दुःखाच्या प्रसंगी ते आमच्यासोबत राहिले आहेत. ते अत्यंत कार्यक्षम असून त्यांना कागदपत्रांचे तपशील, नियम व अटी यांची माहिती असल्याने त्यांच्यासोबत काम करणे सहज ठरते. आपले विद्यार्थी योग्य ठिकाणी व आरामदायी वातावरणात शिकावेत, यासाठी ते सर्वतोपरी काळजी घेतात. विद्यार्थी निवडताना ते चोखंदळ असतात आणि विद्यापीठाचे प्रशासन, प्राध्यापक, व्याख्याते व शिक्षक या समुदायाशी नियमित संपर्कात असतात. ते आपल्या विद्यार्थ्यांबरोबर जवळपास सहा महिने राहतात, जी गोष्ट इतरांच्या तुलनेत दुर्मीळ आहे. मी या कामगिरीबद्दल त्यांचे व त्यांच्या कंपनीचे अभिनंदन करते.
कार्यक्रमाच्या समारोपात या गौरवाला उत्तर देताना डॉ. कामले म्हणाले, की रशियातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचे आम्ही प्रतिनिधीत्व करतो आणि विद्यार्थी व पालकांना वैद्यकीय विद्यापीठांच्या रशियन जाळ्यात एमबीबीएस अभ्यासक्रमाची सर्वोत्कृष्ट संधी मिळवून देणे, हे आमचे कर्तव्य व जबाबदारी आहे. आमच्याकडून होत असलेल्या या उत्तम सेवेबद्दल मी सर्वशक्तिमान परमेश्र्वराचा खरोखर आभारी आहे. त्याने यापुढेही आम्हाला, आमच्या विद्यार्थ्यांना आणि या सहयोगाला असेच कृपाशीर्वाद देत राहावेत.