Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अपंगत्व आलेल्या सेवकांना कामावर रुजू करून घ्या -महापौरांचे तुकाराम मुंडेंना आदेश (व्हिडीओ अखेरचा भाग -3 )

Date:

पुणे-महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) सेवेत कर्तव्य बजावत असताना अपंगत्व आलेल्या कर्मचार्‍यांना हलक्या स्वरूपाची कामे देणे आवश्यक असताना त्याना निलंबन करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. या विरोधात आज मुख्यसभेत सर्वपक्षीय सभासदांनी आक्षेप नोंदवला. नंतर हा निर्णय मागे घेण्याचे आदेश आम्ही संचालक असलेले चौघेही लेखी पत्रानाव्ये तुकाराम मुंडे यांना देवू असे  महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितल्या नंतर पीएमपीएमएल च्या विषयावर मुख्य सभेत पडदा पडला .
पीएमपीएमएलच्या सेवेत कर्तव्य बजावत असताना अनेक कर्मचार्‍यांना अपंगत्व आलेले आहे. या कर्मचाऱ्यांना गर्दीच्या ठिकाणी पूर्वीप्रमाणे कामे करता येत नाहीत. त्यांना बैठ्या स्वरूपाची, हलकी कामे देणे आवश्यक असताना अशा कर्मचार्‍यांना पूर्वीप्रमाणेच कामे करा, अन्यथा निलंबित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले असून तसे आदेश काढण्यात आले आहे
या बाबत आज मुख्य सभेत सर्वपक्षीय सभासदांनी तीव्र आक्षेप नोंदवले आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. याबाबत सभासदांनी सांगितले  की, अपंग कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे  वातावरण पसरले आहे. पीएमपीएमएलने कामावरून काढून टाकले तर कुटुंब कसे चालवावे असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा राहणार  आहे.  आणि चालकाला सेवेत असताना अपंगत्व आले असेल तर त्यांना वाहक आणि चालकाचे काम करता येणार नाही. पीएमपीएमएलने अशा कर्मचार्‍यांवर बैठी आणि हलक्या स्वरूपाची कामे द्यावीत. त्यांना निलंबित करू नये.
या बाबत पीएमपी कडून खुलासा करण्यात आला की, एखाद्या कर्मचाऱ्यांला अपघात झाल्यानंतर पाहिले तीन महिने त्याला 75 टक्के वेतन दिले जाते.  त्या नंतर पुढील तीन महिने 50 टक्के,  तर त्यानंतर तीन महिन्यासाठी 30 टक्के  वेतन देण्यात येते. मात्र  त्यानंतर कर्मचारी सेवेवर रुजू होणे शक्य नसल्यास त्याला सेवानिवृत्त करण्यात येते अशा प्रकारचा शासनाचा नियम असून त्याची  अंमलबजावणी केली जात असल्याचे सांगण्यात आले.

या वर महापौरांनी पीएमपी प्रशासनाला हा निर्णय मागे घेऊन कर्मचाऱ्यांना पुन्हा कामात रुजू करून घेण्याचे आदेश दिले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ट्रेलरमधील सळ्या केबिनमध्ये घुसल्या, चालकाचा दुर्दैवी अंत

पुणे-पुण्यात अवजड वाहनांकडून होणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे....

नवी मुंबईतील कंपनीत गॅस गळती:कामगारांवर कार्बन मोनॉक्साईडचा परिणाम, 25 महिला बेशुद्ध

नवी मुंबईतील एका कंपनीमध्ये गुरुवारी सकाळी गॅस गळतीची घटना...

PMRDA आयुक्त यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दहाव्या वर्धापन...