अतिक्रमणावर जबर दंडाच्या इलाजाचा तीव्र निषेध

Date:

झोपडपट्टी सुरक्षा दलाचे  संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी केला तीव्र निषेध

पुणे-देशात  राज्यात महागाई वाढल्यामुळे रोजगार हि नसल्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी पदपथावर स्टोल अथवा हातगाडी यांच्यावर छोटे व्यवसाय घटक उपजिवेविकेचे साधन म्हणून जगत असताना अतिक्रमणावर जबर दंडाचा इलाज दाखवून अतिक्रमण थोपविण्याचा या कारवाईचा झोपडपट्टी सुरक्षा दलाचे  संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी तीव्र निषेध केला आहे .

वास्तविक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार राज्याच्या नागरी भागात फेरीवाल्याच्या संदर्भात राष्ट्रीय फेरीवाला धोरण लागू करण्याच्या दृष्टिकोनातून नगर रचना विभागाचे आणि भारत सरकारच्या केंद्र सरकारच्या पथ विक्रेत्याबाबतचे पथविक्रेत्याचा उपजीविकेचे रक्षण आदी नियम कायदा ५ मार्च २०१४ रोजी धोरणात्मक असलेला फेरीवाला पथारी कायद्याचा प्रामुख्याने निराधार महिला विधवा महिला मागासवर्गीय अपंग प्रकल्पग्रस्त आणि बेरोजगारातील असलेले तरुण तरुणींना प्राधान्याने वरील धोरणाने परवाना देण्याचे निश्चित केलेल्या कायद्याचे महापालिका दुर्लक्ष करीत आहे .

वरील धोरणानुसार परिसरात असणाऱ्या व्यवसायकांची पथधारकांची अर्ज व गणना करून नाममात्र दर घेऊन त्यांना परवाना व ओळखपत्र देण्याचे निर्देश आहे . ते निर्देश  शहर सुधारणा समितीने न तपासता आणि अंत्यंत दुर्बल घटकातील पथव्यावसायिकांना अतिक्रमनाच्या नावाखाली उध्वस्त करण्याचा धोरणाच्या तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला . दहाहजार ते वीस हजार रुपयांचा दंड म्हणजे अट्टल गुन्हेगारामध्ये पथविक्रेत्यांच्या विरोधात असून त्यांच्या कायद्याची अंमलबजावणी न करता व्यवसायिकांची स्थळे अद्यापही निश्चित झालेली नाहीत . त्याकडे दुर्लक्ष करून अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख माधव जगताप हे अत्यन्त भांडवल व्यवसायिकाकडे असलेली मोठी अतिक्रमणे पाडण्यास त्यांचे धाडस होत नाही . पण रस्त्यावर बैठा पथारी व्यवसायिक हा अतिक्रमण म्हणून त्यांच्याकडे पाहून त्या गरीबाला मारण्याचे धोरण होत असल्यामुळे हि चिंतेची बाब बनली आहे . अशी माहिती  भगवानराव वैराट यांनी या पत्रकाद्वारे दिले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्मार्ट मीटरबाबत पुणे परिमंडलात व्यापक जनजागृती

७२३ गृहनिर्माण सोसायट्यांमधील १ लाख ६६ हजारांहून अधिक ग्राहकांशी थेट संवादपुणे, दि. १२ ऑगस्ट २०२६ : स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या मनातील शंका, प्रश्न आणि गैरसमज दूर करण्यासाठी महावितरणच्या पुणे परिमंडलात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. परिमंडलातील विविध मंडलांचे अधिकारी व कर्मचारी दररोज विविध गृहनिर्माण सोसायट्या, निवासी परिसर आणि ग्राहकांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीची माहिती देत आहेत. ग्राहकांशी थेट संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यावर या मोहिमेत विशेष भर देण्यात आला आहे.पुणे परिमंडलात जुलै महिन्यात तब्बल ७२३ गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जनजागृती मेळावे घेण्यात आले. त्यामध्ये १ लाख ६६ हजार ४०० ग्राहकांनी सहभाग नोंदविला. या उपक्रमादरम्यान ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या १,२७४ वीजबिलविषयक तक्रारींपैकी ९१८ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.स्मार्ट मीटरविषयी माहिती अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी पुणे शहरात दोन ‘एलईडी व्हॅन’ गर्दीच्या ठिकाणी फिरत असून, त्याद्वारे स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धती व फायद्यांची माहिती देणारे व्हिडीओ दाखवून ग्राहकांचे प्रबोधन केले जात आहे.स्मार्ट मीटरचे प्रमुख फायदेदिवसा वीज वापरावर सवलत : सकाळी ९ ते सायं. ५ या दिवसाच्या वेळेत वीज वापराचे नियोजन केल्यास ग्राहकांना वीजखर्चात प्रतियुनिट ८५ पैशांची...

मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाला गती; ५ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे डिसेंबर २०२६ अखेर सुरू करण्याचे नियोजन

११ केंद्रांपैकी ४ केंद्रे कार्यान्वित; प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुण्याची...