ठेकेदारामार्फत विविध खात्यात हे सुरक्षारक्षक गेल्याकाही वर्षांपासून महापालिका सेवेत कार्यरत आहेत. ठेकेदाराकडून वेळेवर वेतन न मिळणे, भविष्यनिर्वाह निधी ठेकेदारानेच लाटणे यासह अनेक समस्यांनी ग्रासलेल्या या सुरक्षारक्षकांच्या व्यथांकडे कायमच दुर्लक्ष करणाऱ्या पालिका प्रशासनाने आता तडकाफडकी सुरक्षारक्षकांना काढून टाकल्याने त्यांची दिवाळी अंधारात जाईल कि काय ? अशी शक्यता असल्याने याबाबत ओरडा झाल्याने दिवाळीनंतर हि पावले उचलण्याचे ठरले आहे . सध्या १८०० सुरक्षा रक्षक तैनात असून ९०० सुरक्षा रक्षकांचे टेंडर ‘राजा उदार झाला’ पद्धतीने म्हणजे ठेकेदारच मोठा कुबेर जणू आणि त्यांने केवळ सामाजिक जबाबदारी म्हणून ‘ना नफा ना तोटा’ पद्धतीने हे टेंडर भरल्याचे स्पष्ट झालेले आहे . अशा स्थितीत या ९०० रक्षकांचे पगाराचे पैसे दिल्यानंतर उर्वरित ९०० रक्षकांना द्यायला पालिकेकडे पैसे उरलेले नाहीत . त्यामुळे आपणास एवढ्या रक्षकांची गरजच नाही . केवळ १२०० रक्षक पुरेसे आहेत . अशी भूमिका घेत ६०० रक्षकांना घरी पाठविण्याचा मनसुबा पालिकेत रचला गेला आहे . कंत्राटी कामगार पद्धतीने कसा अत्याचार चालविला आहे याकडे देशातील एक उदाहरण म्हणून निश्चित पाहता येणार आहे .
पगार द्यायलाच पैसे नाहीत …महापालिका ६०० सुरक्षा रक्षकांना पाठविणार घरी …
पुणे -कंत्राटी पद्धतीने पुणे महापालिका सेवेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या ६०० सुरक्षारक्षकांना कामचुकार संबोधून कामावरून काढून टाकण्याचा डाव पालिकेत रचण्यात आला आहे . पालिकेचे पदाधिकारी आणि प्रशासन या सर्वांना या प्रकारची माहिती असून ,पगार द्यायलाच पैसे नसल्याने खरे तर ही वेळ येवून ठेपली आहे. मात्र तसे कबूल न करता डच्चू देण्याचा घाट घातला जातो आहे . सध्या सुद्धा अनेकांचे तीन तीन महिन्यांचे पगार ठाकले असल्याचे स्पष्ट झाले आहे .
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/
पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल ..
C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079
मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com
- State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra
*1984 पासून पुण्यात पत्रकारिता,
*आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ,
*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद,
*पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ...
*स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले
*इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका .
*निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार
https://www.facebook.com/MyMarathiNews/
Popular
More like thisRelated
कोंढव्यात ‘स्पा’च्या नावाखाली देहविक्रयाचा आरोप; व्यवस्थापकाला अटक, तीन महिलांची सुटका
बनावट ग्राहक पाठवून पोलिसांचा छापा; बी. जी. लोणकर रोडवरील...
चंदुकाका सराफाला १४.७८ लाखांचा गंडा घालून सोन्याची बिस्किटे घेऊन फरार आरोपीला पकडले
चंदननगर पोलिसांनी चंद्रपूरमधून आरोपीला पकडले; सोन्याच्या विक्रीतून मिळालेल्या ८.५०...
घाटकोपरमध्ये भूस्खलन कोसळून 6 जणांचा मृत्यू:4 जण जखमी,पहाटेच्या गाढ झोपेतच काळ आला!
कॅमेऱ्याच्या सहाय्याने शोधमोहीम, अरुंद गल्ल्यांमुळे बचावकार्यात अडथळेमुंबई- रात्रभर...
घरातील ध्वनी प्रदूषणाकडेलक्ष देण्याची गरज- देवेंद्र भुजबळ
पुणे-आपल्या घरात मिक्सर, वॉशिंग मशिन, व्हॅक्युम क्लिनर आदी उपकरणांच्या...

