रस्ता रुंदीकरणात जाणाऱ्या कात्रज डेअरीची सिमाभिंतीसाठी महापालिका खर्च करणार १ कोटी ६ लाख रुपये
कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी कॉलेजसमोरचा पादचारी पुल पाडणार,
पुणे: यापूर्वी ८०० रेमडेसीवर इंजेक्शन मिळविल्यानंतर आता पु.ना .गाडगीळ सराफ यांचा सीएसआर फंड मिळवून त्यातून ६०० रेमडेसीवर इंजेक्शन थेट खरेदी करण्यात स्थायी समितीला यश आले आहे. पुण्यातल्या एसएनडीटी महाविद्यालयासमोरचा पादचारी पुल पाडायला पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिली आहे. महामेट्रोच्या कामात हा पुल अडथळा ठरत होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय कात्रज डेअरी येथून आंबेगाव पठार कडे जाणार्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी पाडावी लागणाऱ्या सीमाभिंती साठी १ कोटी ६ लाख रुपये खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
पुणे महानगरपालिके चे स्थायी समिती अध्यक्ष हेमंतरासने व नगरसेवक दिपकपोटे यांच्या विशेष प्रयत्नातून पुणे महानगरपालिकेस ६०० रेमडेसीवर इंजेक्शन उपलब्ध झाली आहेत.
सदर रेमडेसीवर इंजेक्शन हे पुनागाडगीळ ज्वेलर्स चे सर्वेसर्वा सौरभ गाडगीळ यांनी त्याच्या CSR फंडा च्या माध्यमातून ही मदत केल्या बदल महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सर्टिफिकेट व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी
तसेच सध्याच्या या अवघड परिस्थिती मध्ये इंजेक्शन चा तुटवडा भासत असताना त्रस्त पुणेकरांच्या भावनांची दखल घेत ही इंजेक्शन उपलब्ध करून दिल्याबद्दल व CSR फंड उपलब्ध केल्याबद्दल सौरभ गाडगीळ यांचे सर्व पुणेकरांच्या वतीने आभार मानले .
या प्रसंगी सभागृह नेते गणेश बिडकर ,अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल , नगरसेवक अजय खेडेकर , नगरसेवक राहुल भंडारे,मेडिकल असोसिएशनचे अनिल बेलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कर्वे रस्त्यावरील पादचारी पुल पाडणार –
कर्वे रस्त्यावरील वाहतूक वाढली तशी नागरिकांना रस्ता क्रॉस करायला अडचणी येत होत्या. हे लक्षात घेऊन कॉलेज ते कर्वे रस्ता पार करण्यासाठी पादचारी पुल बांधण्यात आला. पुण्यातील पहिल्या काही पादचारी पुलांपैकी हा एक पुल होता. आता या ठिकाणी महामेट्रोचे काम सुरु झाले आहे. तसेच नळस्टॉप चौकात फ्लायओव्हर देखील बांधण्यात येणार आहे. या कामांना या पुलाची अडचण होत असल्याने आज हा पुल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.स्थायी समितीने या प्रस्तावाला आज मान्यता दिली. हा पुल आता महामेट्रो कडून काढुन सिओईपी हॉस्टेल समोर स्थलांतरीत करण्यात येणार आहे.
कात्रज डेअरी ते आंबेगाव पठार कडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा
सातारा रस्त्याने कात्रज डेअरी येथून आंबेगाव पठार कडे जाणार्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या अनेकवर्ष प्रलंबित कामाला गती मिळणार आहे. कात्रज डेअरीने रस्ता रुंदीकरणासाठी जागा देण्याची तयारी दर्शविल्यानंतर महापालिकेने रस्ता रुंदीकरणामुळे पाडावी लागणारी सीमाभिंत बांधण्यासाठी १ कोटी ६ लाख रुपये खर्च देण्यास मान्यता दिली आहे, कात्रज डेअरीकडून आंबेगाव पठारकडे जाणार्या एकमेव रस्त्याची रुंदी कमी आहे. विशेष असे की आंबेगाव पठार आणि तेथून पुढे आंबेगाव बुद्रुककडे जाणार्या वाहनांची या ठिकाणी मोठी वर्दळ असल्याने या रस्त्यावर सातत्याने गर्दी होते.
२०१७ ला मंजुर करण्यात आलेल्या विकास आराखड्यामध्ये हा रस्ता २४ मी. रुंद दर्शविण्यात आला आहे. या रुंदीकरणामध्ये पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या कात्रज डेअरीचा सुमारे ४ हजार ४१० चौ.मी. भाग बाधित होणार आहे. रस्ता रुंदीकरणामध्ये कात्रज डेअरीच्या ३१४ चौ.मी.च्या तीन बैठ्या इमारतींसोबतच संपुर्ण सिमाभिंत पाडावी लागणार आहे. या भिंतीचा खर्च महापालिकेने उचलण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार भिंत बांधण्यासाठी येणारा १ कोटी ६ लाख रुपये खर्च देण्यासंदर्भातील प्रस्ताव आज स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली.