पुणे- शहरभर आणि उपनगरातील रस्ते ही खड्ड्यांनी व्यापलेले असताना ,केवळ विरोधकच खड्ड्यांची तक्रार करत आहेत आणि सत्ताधारी मात्र करत नाहीत हा प्रशासनाचा दुजाभाव आहे कि कुणाचा दबाव आहे ? असा सवाल आज मुख्य सभेत विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी करताच ‘त्यास हरकत घेणाऱ्या ..आणि त्यावेळी आमच्याकडे खड्डे नाहीत असे वक्तव्य करणाऱ्या उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांची पहा कशी विरोधी पक्षनेते तुपे यांच्याशी खडाजंगी उडाली..
खाजगी कंपन्यांची मेहेरबानी आणि प्रशासनाचा कारभार यामुळे पुणेकरांना खड्ड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप यावेळी चेतन तुपे यांनी केला .