पुणे- वेळीच खड्ड्यात गेलेलं पुणं खड्डेमुक्त करा अन्यथा शिवसेना शिवसेना स्टाईलनं आंदोलन करेल आणि सत्ताधाऱ्यांसह प्रशासन ही खड्ड्यात जाईल असा इशारा आज मुख्य सभेत शिवसनेच्या वतीने पालिकेतील गटनेते संजय भोसले यांनी दिला. शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे यांनीही यावेळी खड्ड्यांची समस्या कथन केली .
शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसपक्षाने मुख्य सभा सुरु होताच ‘सर आली धाऊन, रस्ते गेले वाहून , पुणेकर खड्ड्यांनी त्रस्त ,सत्ताधारी मस्त … अशा घोषणा देत आंदोलन केले . राष्ट्रवादीचे चेतन तुपे पाटील ,दिलीप बराटे ,विशाल तांबे ,तसेच शिवसेनेचे विशाल धनवडे , बाळासाहेब ओसवाल, कॉंग्रेसचे लता राजगुरू ,अजित दरेकर आदींनी महापौरांच्या आसनापुढे येत फलक फडकावून घोषणाबाजी करत आंदोलन केले… पहा एक झलक ….