Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

खड्ड्यातून होणाऱ्या अपघातात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा -संदीप खर्डेकर

Date:

पुणे- खड्ड्यातून होणाऱ्या अपघातात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी आग्रही मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि
क्रिएटिव्ह फौंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पोलीस आयुक्तांसह ,महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे .
कर्वे रस्त्यावरील करिष्मा सोसायटीच्या चौकातील खड्डयामुळे दिनांक १४ जुलै रोजी झालेल्या अपघातात भद्रेश्वर मनमय स्वामी ह्या २९ वर्षीय तरुणाचा हकनाक बळी गेला तर गेल्या आठवड्यात अन्य तीन अपघातात काही वाहनचालक जखमी झाले.या चौकातील सदोष रेलिंग ही एका अपघाताचे कारण ठरली व त्यास धडकून एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले.
याबाबत आज वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त प्रभाकर ढमाले,पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी,अलंकार पोलिस स्टेशन च्या पोलिस निरीक्षक कल्पना जाधव क्रिएटिव्ह फौंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी घटनास्थळी भेट दिली व ह्या अपघातप्रवण (Accident prone) जागेवर विविध उपाययोजना सुचविल्या.श्री संदीप खर्डेकर यांनी त्वरित सर्व संबंधित अधिकाऱ्यांना ही जागेवर बोलावले व येथील खड्डे बुजविण्याचे काम तातडीने करावयास भाग पाडले तर धोकादायक रेलिंग काढून टाकून तेथे सिमेंट चे रोड डिव्हायडर बसविण्याचे काम त्वरित करण्याच्या सूचना दिल्या. ” कोणताही दोष नसताना एक तरुण मृत्युमुखी पडतो तर अनेक जण जखमी होतात,आपण इतके असंवेदनशील झालोय ? आपल्या घरातील कोणीतरी याच रस्त्याने प्रवास करणार आहे याचे तरी भान ठेवा ” अश्या शब्दात ए सी पी ढमाले साहेबांनी उपस्थितांना सुनावल्यावर तातडीने यंत्रणा कामाला लागल्या.अश्या संवेदनशील अधिकाऱ्यांमुळे
( वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त प्रभाकर ढमाले,पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी,अलंकार पोलिस स्टेशन च्या पोलिस निरीक्षक कल्पना जाधव ) एका ठिकाणचा प्रश्न तात्पूरता सुटला आहे मात्र यापुढे खड्ड्यातून अपघात होवुन कोणाचा जीव जावु नये यासाठी पोलिस खाते आणि मनपाने संयुक्त पाहणी करुन असे अपघातप्रवण क्षेत्र Identify करुन तेथे युद्धपातळीवर डागडुजी व खड्डे बुजविण्याचे काम करावे.तसेच यापुढे कोणत्याही भागात खड्ड्या मुळे अपघातात एखाद्याचा जीव गेला किंवा जखमी झाल्यास त्या भागातील कंत्राटदार अथवा कामात कुचराई करणाऱ्या मनपा अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत सर्व पोलिस स्टेशन ला सूचना द्याव्यात अशी आग्रही मागणी क्रिएटिव्ह फौंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे .
तसेच जियो,महावितरण,एम एन जी एल,  सह अन्य कंपन्यांना ३१ मे नंतर खोदाईस बंदी आहे.मात्र त्यापूर्वी त्यांनी खोदलेल्या रस्त्यांचे किंवा पदपथाचे पुनर्डांबरीकरण करताना निष्काळजीपणा केल्याचे ही सोबतच्या छायाचित्रावरुन लक्षात येइल.यासाठी करिष्मा चौकात जियोच्या खोदाईचे दुपारी २ वाजताचे छायाचित्र खर्डेकर यांनी पाठविले आहे .
अशीच स्थिती कर्वे रस्त्यावर अनेक ठिकाणी आहे तर एसएनडीटी समोरच्या डिव्हायडर ला दुरुस्त केले की रात्रीच्या वेळी वारंवार तोडले जाते व अनधिकृत व्यवसायिक तेथून गाड्या काढतात (येथे ही अपघातात एक आजी मृत्युमुखी पडल्या आहेत ) अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.अश्या विकृत प्रवृतींवर ही फौजदारी कारवाई करावी अशी आग्रही मागणी खर्डेकर यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे .
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तुकडेबंदी कायदा रद्द अधिसूचना जारी … बावनकुळे

मुंबई- सरकारने याच अधिवेशनात केलेल्या घोषणेप्रमाणे तुक्देबंदी कायदा रद्द...

मीरा-भाईंदर शहरातील मुख्य रस्ता सिमेंट काँक्रीटचा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १६ : मेट्रो लाईन समवेत असणारे काशिगाव मेट्रो...

आम आदमी पार्टी जिल्ह्यात सर्व स्थानिक निवडणुका लढवणार

पुणे-राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गण,...