पालिका विस्तारित इमारत गळती : दोषी व्यकतींवर कडक कारवाई करणार: गिरीष बापट यांचा इशारा

Date:

नागपूर, दि. 20 : उपराष्ट्रपतीच्या उपस्थितीत  पुणे महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये पावसामुळे झालेल्या गळतीचा अहवाल प्राप्त होताच. दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल. असा इशारा पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी दिला. विधानपरिषदेत अंतिम आठवड्याचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर पुणे महापालिकेतील गळतीच्या विषयावर  लक्षवेधी सूचना दाखल झाली होती. त्यावरील  चर्चेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

बापट पुढे म्हणाले की,  पुणे महानगरपालिकेच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाघाटन प्रसंगी 17 जून 2018 रोजी सभागृहात मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती झाली होती. त्याचे तीव्र पडसाद पुण्यात उमटले होते. त्यानंतर या घटनेची शासनाने गांभीर्याने दखल घेतली .या घटनेची चौकशी करून त्याचा  अहवाल शासनाकडे तातडीने  पाठवावा. असे आदेश पुणे महानगरपालिकेला देण्यात आले  आहेत .उद्घाटनाच्या दिवशी पुण्यात एका तासात 55 मिमी पाऊस झाला. मुख्य सभागृहाच्या छतावर पडलेले पावसाचे पाणी वाहून जाणाऱ्या नळ्या चोकअप झाल्या .त्यामुळे समारंभ चालू असतांनाच  छतावर खूप पाणी साठले. डेकशीट व त्याच्या खालचे बांधकाम यातून सभागृहाच्या एका बाजूला पाण्याची  गळती झाली.  त्यानंतर चोकअप झालेली  वाहिनी मोकळी करण्यात आली. अशी प्राथमिक माहिती शासनाला उपलब्ध झाली आहे.

बापट पुढे म्हणाले की घुमटाकार  छतातून पाण्याची गळती तेव्हाही झाली नव्हती आणि आताही होत नाही. तथापि गळतीचा हा सर्व परिसर अभियंत्याकडून तपासण्यात येत आहे . त्यांच्या अहवालाची आम्ही वाट पाहत आहोत.  बापट पुढे म्हणाले कोथरूड मुंढवा व मौजे बाणेर येथील काही जमिनीच्या आरक्षणासंदर्भात शासनाकडे  लोकप्रतिनिधींनी पाठवलेली निवेदने प्राप्त झाली आहेत त्याबाबच्या सूचना व हरकती  विचारात घेऊन संबंधिताची सुनावणी घ्यावी. व शासनास  अहवाल सादर करावा .असे आदेश नगररचना विभागाला देण्यात आले आहेत .तो प्राप्त झाल्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल . या संदर्भात विधान परिषदेत आज लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. त्यावर खुलासा करताना कोथरूड येथील सर्वे नंबर 159, 160 व 167याचा  काही भाग याचा निवाडा झाला असल्याची माहिती सभागृहात देण्यात आली. शिवणे गावच्या पूरग्रस्तांसाठी ही जागा आहे .त्यावरील खेळाचे मैदान अग्निशामक दल व प्राथमिक शाळा यांच्या आरक्षणाचा फेरविचार व्हावा. अशी विनंती शासनाला करण्यात आली आहे. मुंढवा येथील विकास योजनेत बदल करावा. अशीही विनंती नागरिकांनी केली आहे. या सर्व हरकतीच्या अहवालांची आम्ही वाट पाहत आहोत.

पुणे शहरातील एकात्मिक वाहतूक यंत्रणा  या विषयाचा संदर्भही  गिरीश बापट यांनी दिला. सभागृहात हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता असे सांगून  ते म्हणाले की राज्यातील दहा लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महानगरातील वाहतुकीच्या समस्या सोडवण्यासाठी उमटा ( UMTA ) ची स्थापना मुंबईसाठी करण्यात आली आहे तथापि पुण्याच्या बाबतीत मात्र पुणे महानगर महानगरपालिका विकास प्राधिकरण यांच्याकडून कुमटाचे  काम होणे अपेक्षित आहे . मेट्रो सह वाहतुकीचे  सर्व प्रश्न प्राधिकरणाकडून सोडविणे जातील .असे स्पष्टीकरण सभागृहात एका उत्तराद्वारे  करण्यात आले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींसह सर्व नेत्यांना सोडण्यात आले.

पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या- धर्मेंद्र प्रधान...

महिंद्रा फायनान्सचा तिमाहीतील करोत्तर नफा ₹८९९ कोटी; वार्षिक आधारावर ७०% वाढ

मुंबई, २१ जुलै २०२६: भारतासाठी विश्वासार्ह वित्तीय सेवा पुरवठादार असलेल्या महिंद्रा फायनान्सने ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीचे अलेखापरीक्षित आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने स्वतंत्र आधारावर ₹८९९ कोटींचा करोत्तर नफा  नोंदवला असून, तो वार्षिक आधारावर ७०% वाढला आहे. याच काळात एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १२% वाढून ₹४,९७४ कोटींवर पोहोचले. व्यवस्थापनाखालील मालमत्ता वार्षिक आधारावर १३% वाढून ₹१,३७,४४९ कोटी झाली, ज्याला ₹१५,५६४ कोटींच्या विक्रमी पहिल्या तिमाही वितरणाचा आधार मिळाला — हे वितरण वार्षिक आधारावर २२% अधिक आहे. एकत्रित  आधारावर एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १४% वाढून ₹५,७२५ कोटी झाले, तर करोत्तर नफा ७५% वाढून ₹९२७ कोटींवर पोहोचला. निकालांवर भाष्य करताना महिंद्रा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राऊल रेबेलो म्हणाले, "या तिमाहीतील आमची कामगिरी आमच्या फ्रँचायझीची ताकद अधोरेखित करते — नफाक्षमतेतील सातत्यपूर्ण विस्तार, लवचिक मालमत्ता गुणवत्ता आणि आमच्या वृद्धीकेंद्रित धोरणांच्या दिशेने केलेली प्रगती यातून हे स्पष्ट होते. आमच्या मूळ वाहन फ्रँचायझी, नवीन वृद्धी इंजिने आणि तंत्रज्ञानातील केंद्रित गुंतवणुका नफादायी व शिस्तबद्ध वाढीला पाठबळ देत आहेत." कंपनीने नफादायी व शिस्तबद्ध वाढ कायम राखली असून, निव्वळ व्याज मार्जिन ७.३% पर्यंत विस्तारले, पत खर्च सुधारून १.५% झाला, तर मालमत्तेवरील परतावा मजबूत होऊन २.४% झाला. मालमत्तेची गुणवत्ता सुदृढ राहिली असून, स्टेज ३ मालमत्ता गतवर्षीच्या ३.८% वरून सुधारून ३.५% झाल्या. त्याचबरोबर डिजिटल व एआय (AI) क्षमतांमुळे ग्राहक संपादन, कार्यचालनातील लवचिकता आणि वसुली कार्यक्षमता अधिक बळकट होत राहिली. महिंद्रा फायनान्सने आपल्या वाहनेतर वित्त व्यवसायातही (non-vehicle finance) जोरदार गती अनुभवली असून, MHRFL वगळता या विभागातील वितरण वार्षिक आधारावर ७९% वाढले.