पुणे- दिल्लीच्या नामांकित स्कॉच फौंडेशनकडून पुणे महापालिकेला सुवर्ण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. घरगुती शौचालयासाठी राबवलेल्या ‘वन होम-वन टॉयलेट’ या योजनेत केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल हे कौतुक केलं गेलं. शिवाय घनकचरा आणि स्वच्छतेसाठीही सहा पुरस्कार मिळाले. गेली पंचेचाळीस वर्ष ‘स्कॉच’च्या वतीनं हे पुरस्कार देण्यात येतात.
असे सांगून महापौर प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे कि ,वैयक्तिक शौचालय उभारणीस घेतलेल्या पुढाकाराबद्दल आपण देशामध्ये दुसरा क्रमांक पटकावला. यावेळी पुरस्कार स्वीकारताना अतिरिक्त आयुक्त श्री राजेंद्र जगताप, नगरसेवक महेंद्र पाठारे उपस्थित होते. महापालिकेनं केलेल्या कामांची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाते, याचा आनंद मनाला वेगळं समाधान देऊन जातो.