दौंड (सुशांत जगताप)-राहू ता. दौंड येथिल यवत पोलिस ठाणे हद्दीत, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा राहू, येथे आज रात्री २ः०० वा . चे दरम्यान ४ अज्ञात चोरट्यांनी ड्युटीवर हजर असलेले दोन सिक्युरीटी गार्ड यांना मारहाण करून, त्यांना बांधुन ठेउन , इमारतीचे पाठीमागील खिडकीचे ग्रील गॅस कटरने तोडून बँकेत प्रवेश केला. व लॉकर रूमचे लॉक गॅस कटरने तोडून, रुमध्ये असलेले लॉकर गॅस कटरने तोडून त्यामध्ये ठेवलेली 65 लाख 57 हजार रु. कॅश चोरी करून घेउण गेले.जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील राहू गावातील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक चोरट्यांनी फोडून 65 लाखांची रक्कम घेऊन पोबारा केला.दरम्यान, या घटनेची माहिती समजताच जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक ड़ॉ. जय जाधव, अप्पर पोलीस अधिक्षक तानाजी चिखले, उपविभागीय अधिकारी राजेन्द्र मोरे घटनास्थळी दाखल झाले.चोरट्यांनी अत्यंत चालाखीने बँकेच्या मागील बाजूला असलेल्या खिडकीचे गज कापून आतमध्ये प्रवेश केला. तसेच बँकेच्या आत गेल्यानंतर अत्यंत चालाखीने सीसीटीव्ही कॅमेरा दुसरीकडे वळवला व जाताना कॅमेरातील सीडी घेऊन पोबारा केला.