Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सुवर्णरत्नं गार्डन सोसायटीचा आदर्श गणेशोत्सव – पर्यावरणपुरक पद्धतीने गणेश विसर्जन

Date:

पुणे-संपूर्ण सोसायटीतील कचरा सोसायटीतच जिरविणारा कचरा विघटन प्रकल्प,सर्व इमारतींना रेन वाटर हार्वेस्टिंग प्रकल्प, या पाठोपाठ आम्ही आमच्या सोसायटीच्या गणरायांचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करून अन्य गृहसंकुलांसमोर एक आदर्श निर्माण केलाय असे कर्वेनगर येथील 200 सदनिका असलेल्या सुवर्णरत्न गार्डन सोसायटीच्या अध्यक्ष व शिक्षण मंडळ सदस्य सौ मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले.
गणेशोत्सव तर कोणालाही त्रास होणार नाही अश्या पद्धतीने येथे साजरा केला जातोच,यात मुलांच्या स्पर्धा,करमणुकीचे विविध दर्जेदार कार्यक्रम,भक्तिभावाने शास्त्रोक्त पूजा व आरती,तसेच विविध गुणदर्शन अश्या कार्यक्रमांनी नटलेल्या आमच्या गणेशोत्सवात यावर्षी गणेश विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने करण्याची सूचना केली व सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यास पाठींबा दर्शविला.त्यानुसार पुणे मनपा ने एन सी एल व कमिन्स इंडिया च्या सहकार्याने सुचविलेल्या पद्धतीने म्हणजेच एका मोठ्या टब मध्ये पाण्यात अमोनियम बायकार्बोनेट मिसळून त्या मध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस ची मूर्त्ती विसर्जित करण्याची पद्धत अवलंबिली,असे सौ खर्डेकर यांनी स्पष्ट केले.या वेळी सोसायटीचे उत्सव प्रमुख चंद्रकांत बारटक्के,सचिव स्मिता ढवळीकर,सौ छाया सोनावणे,सौ सरोज कुलकर्णी व अन्य सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.यापासून प्रेरित होऊन अनेक सभासदांनी आपल्या घरचा गणपती हि अश्याच पद्धतीने विसर्जित केला.
मी माझ्या घरी स्वहस्ते शाडू च्या मूर्तीपासून तयार केलीली मूर्ती प्रस्थापित केली होती,त्यास माझ्या कन्येने प्रणेतीने नैसर्गिक रंग दिला व आम्ही घरीच बादलीत या मूर्तीचे विसर्जन करून बाप्पाला निरोप दिला.असे सांगतानाच सौ खर्डेकर यांनी पुढील वर्षी जास्तीत जास्त लोकांना  शाडूच्या  मातीचा गणपती घरच्या घरी तयार करण्यास प्रशिक्षण देण्यास प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले.उत्सव साजरा करताना प्रदूषणावर नियंत्रण आणणे व पर्यावरणपूरक उतरावं साजरा करणे आपल्या सर्वांचेच कर्तव्य असल्याचे ही सौ मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

पुणे:पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास...

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाईमुंबई, दि....

लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत काँग्रेस शिवसेनेबरोबर: हर्षवर्धन सपकाळ.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पक्ष...