Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

वर्गीकरणाच्या तब्बल १०० प्रस्तावांना मंजुरी

Date:

पुणे : सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला अखेर नगरसेवकांच्या आग्रहामुळे वर्गीकरणाच्या तब्बल १०० प्रस्तावांना सोमवारी सर्वसाधारण सभेत मंजुरी द्यावी लागली. यातील बहुसंख्य प्रस्ताव नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील झाडणकामाच्या खर्चासाठी दिलेले आहेत. यावरून सत्ताधारी आणि  विरोधी पक्षातील नगरसेवकांनीही प्रशासनाला धारेवर धरले.
स्विपींग यंत्र (रस्ते झाडून घेणारे यंत्र) खरेदी करण्याचा आयुक्तांचा विचार होता; त्यामुळे यंत्रखरेदीसाठी जास्त तरतूद करण्यात आली. झाडणकामाची तरतूद कमी झाल्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांनी त्यांच्या हद्दीतील कंत्राटी झाडणकामाचे ठेके नामंजूर केले. त्यातून नगरसेवकांचे प्रभाग अस्वच्छ राहू लागले. नागरिकांकडून त्यांच्याकडे तक्रारी येऊ लागल्यावर प्रशासनाने नगरसेवकांना त्यांच्या विकासकामांसाठी अंदाजपत्रकात केलेली तरतूद या कामासाठी वर्ग करून देण्याचा उपाय सुचवला व त्यातून हे सगळे प्रस्ताव तयार झाले. प्रत्येक नगरसेवकाने त्याने सुचवलेल्या कामाची तरतूद झाडणकामासाठी म्हणून वर्ग करावी, असा प्रस्ताव दिला आहे.
अशा शंभरपेक्षा जास्त प्रस्तावांना सोमवारच्या सभेत मंजुरी देण्यात आली. बाबूराव चांदेरे यांनी वर्गीकरणाला विरोध नाही; पण त्यासाठी नगरसेवकांच्या निधीवर का डोळा ठेवला जात आहे, असा सवाल केला. प्रशासनाने झाडणकामासाठी पुरेशी तरतूद का केली नाही, असे ते म्हणाले. गोपाळ चिंतल यांनीही प्रशासनाला जबाबदार धरले व तुमच्या चुकीच्या नियोजनाचा फटका नगरसेवकांना बसत आहे, अशी टीका केली.
विशाल तांबे यांनी क्षेत्रीय कार्यालयांची हद्द बदललेली आहे, या फेररचेनेमुळे झाडणकामाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत, असे सांगितले. महापौर मुक्ता टिळक यांनी ते मान्य करून तांबे यांच्या सूचनेप्रमाणे फेरररचना करून घ्यावी, असे सांगितले.
स्थायी समितीच्या सदस्या मंजूषा नागपुरे यांनी प्रभागात झाडणकामाच्या अडचणी होत आहेत. नागरिकांकडून तक्रारी येत असल्यामुळे विकासकामांचा निधी त्याकडे वर्ग केला जात आहे, असे स्पष्ट केले. स्थायी समितीने १० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी यामुळेच मंजूर करून दिला असल्याचेही त्यांनी सांगितले. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त सुरेश जगताप यांनी अंदाजपत्रकात तरतूद कमी केली गेल्यामुळेच ही समस्या निर्माण झाली असल्याचे स्पष्ट केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरन्याधीश भूषण गवईंचा प्रोटोकॉल न पाळून भाजपा युती सरकारकडून अपमान, आंबेडकरी विचारांचे असल्याने अपमान केला का? : नाना पटोले

सरन्यायाधिशांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार. राज्य...

पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मे पासून सुरू

पदविका अभ्यासक्रम नोकरी व उद्योगासाठी उपयुक्त पर्याय; अधिकाधिक विद्यार्थ्यांनी...