Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

… राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस ची पुन्हा आघाडी.. ची चर्चा .. नेते राजी ….

Date:

पुणे : भारतीय जनता पक्षाची आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर पुणे महापालिकेची निवडणूक एकत्र लढविण्यासाठी नेत्यांच्या आग्रहपूर्वक भूमिकेमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची  अखेर आघाडीझाल्याचे वृत्त आहे . मात्र, काही जागांवर अखेरपर्यंत एकमत होत नाही  तेथे मैत्रिपूर्ण लढतीचा पर्याय स्वीकारण्यात आला.म्हणजे  काही ठिकाणी आघाडी तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत अशा द्विधा अवस्थेत हि निवडणूक लढविण्याचा प्रकार होणार असल्याचे आज येथे वृत्त होते. मात्र अधिकृतरीत्या बोलायला दोन्ही पक्षांचे नेते अध्यक्ष माध्यमांपुढे  सायंकाळपर्यंत आले नाहीत . यामुळे इच्छुकांची मोठी गोची होऊन बसली होती . दुसरीकडे काही उमेदवार ज्यांना निवडणूक लढवायचीच आहे अशांनी आघाडीच्या बैठका , चर्चांकडे ढुंकूनही पहायचे नाही प्रचार सुरु ठेवायचा अशी भूमिका घेतली होती .

यापूर्वी  दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली होती. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शहराध्यक्ष वंदना चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम यांची संयुक्त बैठक अगोदर विश्वजित कदम यांच्या बंगल्यावर झाली त्यानंतर हॉटेल वेस्ट इन येथे झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. यानुसार  सुमारे सात जागांवर दोन्ही काँग्रेसमध्ये मैत्रिपूर्ण लढती होणार असून, उर्वरित जागांवर आघाडीतर्फे उमेदवार दिला जाणार आहे. आघाडीच्या जागा वाटपाच्या प्रस्तावाला मान्यता घेण्यासाठी डॉ. कदम आणि बागवे हे  मुंबई येथील प्रदेश कार्यालयात गेले असल्याची माहिती मिळाली आहे.

 सुरवातीला काँग्रेसने 72 जागांचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसला दिला होता. तो फेटाळून अवघ्या 46 जागा देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसेच्या शहरातील नेत्यांनी दाखविली होती. त्यानंतर होणाऱ्या प्रत्येक बैठकीत आघाडीतील आकडे बदलत गेले. पण, अखेर 18 प्रभागांवर गेल्या दोन दिवसांपासून एकमत होत नव्हते. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाल्याचे संकेत दोन्ही काँग्रेस नेत्यांनी दिले होते. आता लढण्यासाठी ६७ जागा कॉंग्रेसला मिळतील उर्वरित जागांवर  राष्ट्रवादी लढेल असे सांगण्यात येत आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारी बँकांनी ग्राहक आणि लोकाभिमुख व्हायला हवेउपमुख्यमंत्री अजित पवार

रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा...

संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती.. म्हणून पत्रा चाळ ED: शरद पवारांची फटकेबाजी

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला...

तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

मुंबई “जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड...