पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भारतात 5G मोबाइल सेवा सुरू केली. यादरम्यान पंतप्रधानांनी नवी दिल्लीत बसून युरोपमधील कारची रिमोट चाचणी केली. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पीएम मोदी समोरच्या स्टेअरिंगने कार कंट्रोल करत आहेत. कारच्या चाकांची हालचाल समोरच्या स्क्रीनवर दिसत आहे.
दिल्लीतील इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये पंतप्रधान एरिक्सन कंपनीच्या बूथवर पोहोचले. येथे त्यांनी स्वीडनमध्ये 5G तंत्रज्ञानाद्वारे अप्रत्यक्षपणे कार चालवली. युरोपमधील कारचे स्टिअरिंग कंट्रोल 5G तंत्रज्ञानाद्वारे दिल्लीशी जोडण्यात आले होते. याशिवाय पीएम मोदींनी या कार्यक्रमात अनेक तांत्रिक नवनवीन गोष्टींचाही अनुभव घेतला.