Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सात देशांमधील चित्रपट तज्ज्ञ करणार PIFF महोत्सवातील चित्रपटांचे परीक्षण

Date:

पिफ अंतर्गत विविध स्पर्धात्मक विभागाच्या अंतिम फेरीत निवड झालेल्या चित्रपटांची घोषणा

पुणे : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणा-या  पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील विविध स्पर्धात्मक विभागात निवड झालेल्या चित्रपटांच्या नावांची घोषणा आज महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी केली. येत्या १२ ते १९ जानेवारी, २०१७ दरम्यान होणा-या या महोत्सवातील चित्रपटांची अधिक माहिती देण्यासाठी आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. पटेल बोलत होते.

महोत्सवाचे क्रिएटिव्ह हेड व चित्रपट निवड समितीचे सदस्य अभिजित रणदिवे, पिफ बझारचे समन्वयक श्रीरंग गोडबोले, अखिल भारतीय चित्रपट मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 आज झालेल्या पत्रकार परिषदेत वर्ल्ड कॉम्पिटिशन अंतर्गत निवड झालेल्या जगभरातील १४ चित्रपटांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ज्यामध्ये ‘लेडी ऑफ दी लेक’ या हौबम पबन कुमार दिग्दर्शित भारतीय चित्रपटाचाही समावेश आहे. याबरोबरच स्टुडण्ट कॉम्पिटिशनमध्ये लाईव्ह अॅक्शन व अॅनिमेशन असे दोन भाग असून यातील लाईव्ह अॅक्शन विभागात १३ तर अॅनिमेशन विभागात १६ चित्रपटांचा समावेश आहे.

यावर्षी लाईव्ह अॅक्शन विभागात ४ भारतीय चित्रपटांचा समावेश असून त्यापैकी ‘अंधेरे मैं’ आणि ‘कल्पवृक्ष’ हे दोन चित्रपट पुण्यातील भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट अर्थात एफटीआयआय या संस्थेतील विद्यार्थ्यांनी दिग्दर्शित केलेले आहेत हे विशेष. तर अॅनिमेशन विभागात सेंट झेविअर्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिग्दर्शित केलेला ‘टमलिंग स्ट्रीट’ व व्हिस्लींग वूड्स इंटरनॅशनलच्या दोन चित्रपटांचा समावेश आहे. यावर्षी कंट्री फोकस विभागात अर्जेंटीना व व्हिएतनाम या दोन देशांतील चित्रपट पाहता येणार असून याबरोबरच रेट्रोस्पेक्टिव्ह विभागात आंद्रे वायदे आणि अपर्णा सेन यांचे चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

दरवर्षी प्रमाणेच यंदाच्या वर्षीही महोत्सवात दाखविल्या जाणा-या चित्रपटांच्या परीक्षणासाठी जगातील निवडक चित्रपट तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये अपर्णा सेन (भारत), प्रो. जेर्झी स्टर (पोलंड), गोरान पास्कलजेव्हिक (सर्बिया), जॉर्ज अरियागाडा (चिली), जेन्स फिशर (स्वीडन), गोवरी रामनारायण (भारत), बेनेट रत्नायके (श्रीलंका) आणि नर्गिस अबायर (इराण) यांचा समावेश आहे.

या निवड झालेल्या चित्रपटांबद्दल बोलताना डॉ. जब्बार पटेल म्हणाले की, पर्यावरण ही यावर्षीच्या महोत्सवाची संकल्पना असून यावर्षीच्या महोत्सवासाठी आमच्याकडे जगभरातील ९५ देशांमधून तब्बल अकराशे चित्रपटांनी आपला सहभाग नोंदविला होता. पैकी निवड समितीने २२५ अधिक चित्रपटांचा समावेश महोत्सावात करण्यात आला असून हे सारे चित्रपट या महोत्सावा दरम्यान चित्रपट रसिकांना पाहता येणार आहेत.

महोत्सवा दरम्यान फर्स्ट बॉर्न (चिली) या चित्रपटाचा इंटरनॅशनल प्रीमिअर तर व्हेअर ग्रो ओल्ड (ब्राझील/ पोर्तुगल), ल्युईस बाय दी शोअर (फ्रांस), लिटील माउंटन बॉय (स्वित्झरलॅण्ड) आणि देवभूमी (भारत) या चित्रपटांचा इंडीयन प्रीमिअर होणार असल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले.

पिफ बझार बद्दल अधिक माहिती देताना श्रीरंग गोडबोले म्हणाले की, मागील वर्षी मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर याहीवर्षी आम्ही पिफ बझार अंतर्गत अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आहोत. ज्यामध्ये चित्रपट विषयाशी संबंधित कार्यशाळा, चर्चासत्रे, व्याख्याने यांचा समावेश असणार आहे. यावर्षी पिफ बझारच्या पॅव्हेलियनचे नामकरण हे दादासाहेब फाळके पॅव्हेलियन असे करण्यात आले असून यांद्वारे दादासाहेब फाळके यांना मानवंदना वाहण्यात येणार आहे. ज्यामध्ये त्यांच्यावरील चित्रप्रदर्शनी, हायलाईट्स, चित्रपट यांचा समावेश असणार आहे. पिफ बझार हे सर्वांसाठी खुले आणि विनामूल्य असणार असून त्याचा सर्व चित्रपट रसिकांनी लाभ घ्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

याशिवाय दिग्दर्शक, अभिनेते, लेखक व तंत्रज्ञ यांसाठी खास टेक्निकल लॅब कार्यशाळेचे आयोजन देखील करण्यात येणार आहे. ज्यामध्ये चित्रपटांशी संबंधित अनेक विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येईल.   ही कार्यशाळा मोफत असून यासाठी www.imepl.net/pbworkshop या संकेतस्थळावर आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे.

               पिफ २०१७ मधील स्पर्धात्मक विभागात निवड झालेले चित्रपट पुढीलप्रमाणे –

वर्ल्ड सिनेमा

१)    झुलॉजी (फ्रांस, जर्मनी), दिग्दर्शक – इवान त्वेरदोवस्की

२)    समवन टू टॉक टू (चीन), दिग्दर्शक- युलीन लिऊ

३)    द स्टुडण्ट (रशिया) , दिग्दर्शक- किरील सेरेबेनी कॉव्ह

४)    अ डिसेंट वूमन (अर्जेंटिना), दिग्दर्शक – लुकान वेलेंटा रिनर

५)    स्लॅक बे (फ्रांस), दिग्दर्शक- ब्रुनो दुमॉण्ट

६)    लॉस्ट इन म्युनिक (झेक रिपब्लिक), दिग्दर्शक- पीटर झेलेंका

७)    द लॅण्ड ऑफ एनलायटण्ड (बेल्जियम), दिग्दर्शक – पीटर-यान दे पू

८)    प्ले ग्राउंड (पोलंड), दिग्दर्शक – बार्तोझ एम कोव्हाल्स्की

९)    द इनोसंटस् (फ्रांस), दिग्दर्शक – अॅन फॉन्टेन\१०) इन बीटविन ( इस्राईल), दिग्दर्शक – मेसालून हमुद

११) करस्पॉण्डन्सेस (पोर्तुगाल), दिग्दर्शक – रेटा अझेवेबो गोम्स

१२) गॉडलेस (बल्गेरिया) , दिग्दर्शक – रेलित्झा पेत्रोवा

१३) लेडी ऑफ दी लेक (भारत), दिग्दर्शक – हौबम पबन कुमार

१४) डोण्ट टेल ओरान पामुक दॅट हिज नॉव्हेल स्नो इज इन दी फिल्म आय मेड अबाउट कार्स (टर्की), दिग्दर्शक – रिझा सॉनमेझ

स्टुडण्ट कॉम्पिटिशन लाईव्ह अॅक्शन विभाग –

१)    दी स्टेप मदर (चीन), बीजिंग फिल्म अकादमी

२)    टेनन्टस् (पोलंड), पीडब्लूएसएफटीव्हीआयटी

३)    कान्चे (भारत), व्हिस्लींग वूड्स इंटरनॅशनल

४)    एक्झॉडस (जॉर्जिया), थिएटर अॅण्ड फिल्म जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटी

५)    अॅजेलुस नोव्हूस (इंग्लंड), लंडन फिल्म स्कूल

६)    अंधेरे मैं (भारत), एफटीआयआय

७)    स्ट्रेंज बर्ड (बेल्जिअम), लुका स्कूल ऑफ आर्ट्स

८)    होमलेस (साउथ आफ्रिका), एएफडीए

९)    कल्पवृक्ष (भारत), एफटीआयआय

१०) पीटर पॅटर गोज माय हार्ट(अमेरिका), कोलंबिया युनिव्हर्सिटी

११) दी पॅट्रीऑट (इंग्लंड), नॅशनल फिल्मअॅण्ड टेलिव्हिजन स्कूल

१२) फुलपाखरू (भारत), व्हिस्लींग वूड्स इंटरनॅशनल

१३) एव्हरीथिंग विल बी ओके (ऑस्ट्रीया), युएमडीके

स्टुडण्ट कॉम्पिटिशन अॅनिमेशन विभाग-

१)     हॅपीएन्ड (झेक रिपब्लिक)–एफएएमयु

२)     सम थिंग– (जर्मनी) –एफएबीडब्लू

३)     मिसिंग की (फ्रान्स) –ईएसएमए

४)     वेलिंग्टन ज्युनिअर (फ्रान्स)– ला फेमिस

५)     मिला फॉग (स्लोवाकिया)–व्हीएसएमयु

६)     दि सीसाईड  (इंग्लंड)–नॉर्दनफिल्मस्कुल

७)     दि थ्री रींगसर्कस (बेल्जियम) –केएएसके

८)     ब्लक शिप (साऊथ आफ्रिका) –एएफडीए

९)     टमलिंग स्ट्रीट (भारत) – सेंट झेविअर्स महाविद्यालय

१०)  हम (अमेरिका)–चॅपमनयुनिव्हर्सिटी

११)  दि केस ऑफ निप्स अँड पोकिंग्टन (कॅनडा)–शेरीडन महाविद्यालय

१२)  डोण्ट फरगेट अबाउट मोरी (रशिया) –एसपीएसआयएफटी

१३)  अनदर एव्हरेस्ट (अमेरिका)–युएनसीएसए

१४)  व्हेन इट रेन्स आऊटसाईड (जॉर्जिया)–टीएएफयु

१५)  डी ७२९ (बेल्जियम) –आरआयटीसीएस

१६)  प्रोमीनेड (इटली) – एमसीएससी

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी- ॲड. अनुरुद्र चव्हाण यांची निवड

पुणे : महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अर्थात कर सल्लागार...

पर्यावरणाच्या रक्षणासाठी वसुंधरा फाऊंडेशनचे कार्य गौरवास्पद : ममता सिंधूताई सपकाळ

पुणे : एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जेव्हा एक भावना, दिशा...

अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुल मुलांच्या किलबिलाटाने गजबजले

पुणे- आज महाराष्ट्र राज्यातील बहुतांश आणि पूणे मनपाच्या सर्व...