रकुल प्रीत सिंगचा प्रमोशनमध्ये सहभाग
मिआ बाय तनिष्कच्या ट्रेंडी दागिन्यांसह निसर्गाच्या नाजूक सौंदर्यामध्ये हरवून जा
मुंबई-: अक्षय तृतीया जवळ येत आहे आणि या निमित्ताने भारतातील सर्वात ट्रेंडी फाईन ज्वेलरी ब्रँड्सपैकी एक, मिआ बाय तनिष्कने सादर केले आहे आपले नवे कलेक्शन ‘ग्लो विथ फ्लो‘. मिआचे हे नवे कलेक्शन निसर्गाच्या नाजूक सौंदर्यापासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आले आहे. ही डिझाइन्स नदीच्या प्रवाहासारखी आहेत, आशीर्वाद, नवी सुरुवात आणि समृद्धी दर्शवतात. हे कलेक्शन आयुष्यातील अमर्याद संभावनांचा सन्मान करते आणि अक्षय समृद्धीचे सार दर्शवते.
हवेच्या सौम्य लहरी आणि नदीच्या प्रवाहातील लय यांनी प्रेरित होऊन तयार करण्यात आलेल्या ‘ग्लो विथ फ्लो‘ कलेक्शनमधील प्रत्येक दागिना जीवनाच्या प्रवाहातील सद्भावनेचे प्रतीक आहे. २०० पेक्षा जास्त डिझाइन्ससह १४ आणि १८ कॅरेटचे सोने व चमचमत्या हिऱ्यांचे दागिने आधुनिक, सुबक आणि ट्रेंडी आहेत. कोणत्याही प्रसंगी सहजपणे स्टाईल करता यावेत यादृष्टीने डिझाईन करण्यात आले आहेत. यामध्ये स्टड्स, अंगठ्या, बांगड्या, झुमके, इयर कफ, पेंडंट आणि नेकवेयर सेट्स देखील आहेत. मिआने अक्षय तृतीयेसाठी विशेष ऑफर प्रस्तुत केल्या आहेत, यामध्ये ग्राहकांना ५००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या हिऱ्यांच्या उत्पादनांवर १ खरेदीवर ३%* ची सूट, २ खरेदीवर १०%* सूट आणि ३ खरेदीवर १५%* सूट मिळू शकते. सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर सरसकट १०% ची सूट दिली जात आहे. याशिवाय ७५००० रुपयांपेक्षा जास्त बिलावर ग्राहकांना सरसकट १५% सूट* मिळेल. तनिष्कच्या सर्व रिटेल आउटलेट्स आणि ऑनलाईन चॅनेल्सवर १ ते १२ मे २०२४ पर्यंत या ऑफरचा लाभ घेता येईल.
हवा आणि पाण्याच्या लहरींमधील सौंदर्य ल्यायलेली ही शानदार डिझाइन्स असीम क्षमता दर्शवतात. यामध्ये केशी मोत्यांनी सजलेले दागिने आहेत, मनमोहक चमक आणि आकर्षक डिझाइन्समध्ये जडवण्यात आलेले हिरे प्रसिद्ध आहेत. या कलेक्शनची प्रेरणा प्रतिबिंबित करणारे, स्लायडिंग पर्ल असलेले दागिने या कलेक्शनच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहेत. झऱ्यांची आठवण करून देणाऱ्या कानातल्यांपासून पानांमधून वाहणाऱ्या मंद हवेची शीळ ऐकवणाऱ्या नाजूक बांगड्या आणि चमकदार पिवळ्या सोन्यापासून बनवलेल्या अंगठ्या आनंदाने भरलेल्या जीवनाची प्रतीके आहेत. कलेक्शनमधील प्रत्येक दागिना उत्साहपूर्ण स्वप्ने व जीवनातील अमर्याद क्षमता दर्शवतो.
मिआच्या दुनियेत तुमचे स्वागत आहे, याठिकाणी प्रत्येक दागिना आनंद आणि सौंदर्याची कथा सांगतो. लग्नासारख्या शुभ प्रसंगी भेट म्हणून देण्यासाठी हे दागिने उत्तम आहेत. एखाद्या महत्त्वाच्या यशाचा आनंद साजरा करणे असो किंवा ही अक्षय तृतीया संस्मरणीय बनावी अशी इच्छा असो, मिआचे दागिने तुमच्या भावना दर्शवतात.
कलेक्शनबद्दल मिआ बाय तनिष्कच्या बिझनेस हेड श्रीमती श्यामला रमणन यांनी सांगितले, “यंदाच्या अक्षय तृतीयेला मिआचे ‘ग्लो विथ फ्लो‘ कलेक्शन लॉन्च करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. ‘ग्लो विथ फ्लो‘ चे दागिने खास इन–हाऊस डिझाईन करण्यात आले आहेत. हे दागिने नदीचा प्रवाहा आणि त्याच्या विविध मूड्सपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आले आहेत – जिवंत, शांत, लयबद्ध नदी जिथे वाहते तिथे जीवन आणि समृद्धीचा संचार होतो.
हिरे पाण्यावर सूर्याची चमक आणि केशी मोती पाण्यावर चांदण्याची चमक दर्शवतात. प्रत्येक डिझाईन आधुनिक आणि कालातीत आहे. थोडे थांबून, आत्मविश्वासासह जीवनाची वाटचाल आशा व आत्मविश्वासाने पुढे नेण्याची आठवण करून देतात.
मिआच्या टीमकडून तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा.”
‘ग्लो विथ फ्लो‘ हे केवळ दागिन्यांचे कलेक्शन नाही तर उत्साही स्वप्ने व जीवनातील विपुल संधींचा आनंद आहे. प्रत्येक दागिना व्यक्तीचा आंतरिक प्रकाश दर्शवतो.
या, मिआच्या ‘ग्लो विथ फ्लो‘ कलेक्शनसह जीवनातील अंतहीन प्रवाहातील जादूचा आनंद घ्या. सर्व मिआ स्टोर्स, निवडक तनिष्क स्टोर्स आणि मिआची होमसाईट https://www.miabytanishq.com/ व ऍप्लिकेशनसहित अनेक ऑनलाईन चॅनेल्सवर हे कलेक्शन उपलब्ध आहे.