मुंबई, २ मे २०२४: टाटा प्रोजेक्ट्सने आर्थिक वर्ष २०२४ च्या आर्थिक निष्कर्षांची घोषणा केली.
शाश्वत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने काम करणारी, भारतातील आघाडीची इंजिनीयरिंग, प्रोक्युअरमेंट व कन्स्ट्रक्शन कंपनी आणि जागतिक पातळीवरील नामांकित टाटा समूहातील एक सदस्य, टाटा प्रोजेक्ट्सने आर्थिक वर्षासाठीच्या आपल्या आर्थिक निष्कर्षांची घोषणा केली आहे.
टाटा प्रोजेक्ट्सचे एमडी आणि सीईओ श्री विनायक पै यांनी आर्थिक वर्ष २०२४ मधील कामगिरीविषयी सांगितले, “धोरणात्मक एकत्रीकरण, संघटनात्मक परिवर्तन आणि संचालनात्मक क्षमतांवरील भर याचे लाभ मिळू लागले आहेत. आम्हाला पुन्हा नफा मिळू लागला आहे आणि आम्ही नावीन्य व तंत्रज्ञानाच्या बळावर अंदाज करण्यायोग्य व शाश्वत प्रकल्प करण्याच्या मार्गावर पुढे जात आहोत याचा आम्हाला अभिमान आहे.”
श्री पै यांनी पुढे सांगितले, “कामाची सुरक्षित जागा पुरवून, भारतीय कन्स्ट्रक्शन उद्योगक्षेत्रात सर्वोत्तम सुरक्षा मापदंड निर्माण करून टाटा प्रोजेक्ट्सने उद्योगक्षेत्रातील आघाडी कायम राखली आहे. विविधता आणि समावेशाप्रती आमची बांधिलकी आमच्या लीडरशिप टीममधून दिसून येते, आघाडीच्या डीअँडआयवर आमचे उद्योगक्षेत्र भर देत असल्याचे हे एक उदाहरण आहे. आमच्या प्रमुख कौशल्य विकास कार्यक्रमामार्फत कन्स्ट्रक्शनच्या भविष्याला आकार दिला जात आहे याचा आम्हाला खूप आनंद होत आहे.”
धोरण आणि वृद्धी: कंपनीने आपल्या प्राधान्य दिल्या जात असलेल्या क्षेत्रांमध्ये सिलेक्टिव्ह बिडिंग करण्याचे, लाभदायक वृद्धीला चालना देण्याचे, कॉम्प्लेक्स प्रकल्पांवर भर देण्याचे आणि अनुकूल बाजारपेठ स्थितीचा लाभ घेण्याचे धोरण कंपनीने कायम राखले आहे. नावीन्य आणि तंत्रज्ञानामार्फत, अंदाज लावण्यायोग्य व शाश्वत प्रकल्प करून देऊन ग्राहकांना आनंद मिळवून देण्यावर आमचा धोरणात्मक भर आहे. टाटा प्रोजेक्ट्स नवनवीन संधींचा लाभ घेऊन बाजारपेठेत विस्तार करण्यासाठी सज्ज आहे.
तंत्रज्ञान व नावीन्य यांना चालना: उद्योगक्षेत्रातील आघाडीच्या क्षमता आणि नावीन्य यांना चालना देण्यासाठी डिजिटल प्रोजेक्टवर आम्ही आमचा भर वाढवला आहे. त्यासाठी आणि मजबूत आयटी कोर उभारण्यासाठी आम्ही वर्षभरात सॅप ईआरपी मायग्रेट केले. फक्त ९ महिन्यात कार्यान्वित करण्यात आल्यामुळे हे ईपीसी सेक्टरमधील एक सर्वात वेगवान रोल आउट ठरले आहे. या वर्षभरात आम्ही अनेक तंत्रज्ञान भागीदारी केल्या आहेत आणि त्याद्वारे आमच्या ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा पुरवल्या आहेत. या भागीदारींमुळे टाटा प्रोजेक्ट्सला बांधकामात पर्यावरणपूरकतेला चालना देता येईल आणि आपल्या प्रकल्पांचे कार्बन फूटप्रिंट कमी करता येईल.
नवभारताची उभारणी: गुजरातेतील मायक्रॉन सेमीकंडक्टर युनिट, चेन्नई मेट्रो लाईन आणि तामिळनाडूतील टाटा पॉवर सोलर प्लांट यांनी संपादन केलेले यश नवभारताच्या उभारणीमध्ये तंत्रज्ञान उन्नती घडवून आणण्याची टाटा प्रोजेक्ट्सची बांधिलकी दर्शवते. हे आणि नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्टसारखे इतर अनेक प्रकल्प त्यांचे गुंतागुंतीचे स्वरूप आणि प्रोजेक्ट डिलिव्हरीचे मर्यादित वेळेचे शेड्युल या बाबी एकीकृत प्रकल्प ठरलेल्या किमतीत आणि वेळेत पूर्ण करून देण्याच्या आमच्या क्षमतेमध्ये आमच्या ग्राहकांनी दर्शविलेला विश्वास दाखवून देतात.
आर्थिक वर्ष २०२४ मध्ये अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्ण करून यशस्वीपणे सुपूर्द करण्यात आले. यामध्ये नवीन संसद भवन, अटल सेतू (एमटीएचएल), फर्स्ट सोलर आयएनसीसाठी सोलर मॅन्युफॅक्चरिंग युनिट, डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉरचे अनेक शेकडो किलोमीटरचे बांधकाम आणि इसरोसाठी ट्रायसॉनिक विंड टनेल यांचा समावेश आहे. अशाप्रकारे टाटा प्रोजेक्ट्स नवभारताची उभारणी करण्यात मोलाचा हातभार लावत आहे.