नगरविकास खात्यातील फाईली चेक करतानाचा किरीट सोमय्यांचा फोटो व्हायरल…

Date:

सोमय्या म्हणतात – आघाडी सरकारला भीती कशाची वाटतेय?

मुंबई -भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईत मंत्रालयात जाऊन नगरविकास खात्यातील काही फाईली तपासल्या. या फाईली तपासत असतानाचा त्यांचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यावरून किरीट सोमय्यांवर टीका केली जात आहे. काँग्रेसने या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. यानंतर किरीट सोमय्या यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच आघाडी सरकारला भीती कशाची वाटतेय? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.याविषयी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, ‘मी कोणत्या कोणत्या फायली तपासल्या याची भीती वाटतेय का? वायकरांची फाईल होती की सरनाईक यांची फाईल होती? किंवा अशोक चव्हाणांची होती? मला वाटते याचीच भीती आघाडी सरकारला आहे. तसेच वेगवेगळ्या स्तरातून माहिती मिळते. घोटाळेबाजांची माहिती मिळते. उद्धव ठाकरेंपासून अशोक चव्हाणांपर्यंतची माहिती आम्हाला असते. मी कुठेही जात, जातो. माहिती गोळा करत असतो आणि घोटाळेबाजांना पाठवतो’असे देखील किरीट सोमय्या म्हणाले.तसेच पुढे बोलताना सोमय्या म्हणाले की, ‘माझ्यावर आधीच आघाडी सरकारमधील नेत्यांनी 13 गुन्हे दाखल केलेले आहेत. माझ्यावर माझ्या कुटुंबावर चौकश्या लावल्या आहेत. आता आणखी एक चौकशी होऊन जाऊ दे’ असा टोला देखील किरीट सोमय्या यांनी लगावला होता.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जठार, नाईक,भेंडे, कोल्हे,कर्जतकर आणि प्रज्ञा सातवांना भाजपची उमेदवारी

मुंबई:विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय...

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा

महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश. मुंबई...

इंडिगो-एअर इंडियाने म्हटले – विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली-आगामी काळात विमान प्रवास महाग होऊ शकतो, कारण...

मारुतीचा चौथ्या तिमाहीत नफा 6% नी घटला

मुंबई-ऑटोमोबाइल कंपनी मारुति सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या...