पेट्रोल-डिझेलवरील कर केंद्रानेच कमी करावेत- उपमुख्यमंत्री अजित पवार

Date:

मुंबई- गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या इंधन दरवाढीवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेत यासंदर्भात त्यांनी भूमिका मांडली आहे. पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडल्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे राज्यातील जनतेवर कोणताही नवा टॅक्स लावणार नाही. मात्र, राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवरील करही कमी करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. सामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनेच पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करावेत. केंद्र सरकारचे कर राज्याच्या करापेक्षा कितीतरी अधिक आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. सीएनजी गॅसवरील हजारो कोटींचा कर कमी केला! राज्य सरकारने सीएनजीसह पीएनजी गॅसवरील हजारो कोटींचा कर कमी केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील गृहिणी, ऑटोरिक्षाचालक, छोटे वाहतूकदार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता पेट्रोल-डिझेलवरील कर राज्य सरकार कमी करू शकत नाही. त्यामुळे केंद्र सरकारनेच याबाबत दिलासा द्यावा, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, केंद्र सरकारने इंधनावरील दर कमी करावेत यासाठी राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसतर्फे आंदोलने सुरू आहेत. कधी नव्हे ऐवढे इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. याची दखल केंद्राने घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. शरद पवार – मोदींच्या भेटीबाबत भाष्य नाही! कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. त्यावर काही महत्त्वाच्या मुद्द्यासंबंधी चर्चा करण्यासाठी या दोन नेत्यांनी भेट घेतली होती. ही भेट झाल्यानंतर शरद पवार यांनी स्वत: याबाबत आपल्याला माहिती दिली, असे अजित पवार यांनी सांगितले. तसेच, भेटीबाबत शरद पवार यांनी काल स्वत: आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे त्याबाबत अधिक भाष्य मी करणार नाही. एकदा शरद पवारांनी भूमिका मांडल्यावर आम्हाला अधिक काही बोलण्याची गरज नाही, असेही अजित पवार म्हणाले. निधी वाटपाबाबत भेदभाव केला नाही! निधी वाटपाबाबत काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याचे विचारल्यानंतर निधी वाटपाबाबत मी कोणताही भेदभाव केला नाही, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले. कोरोना काळात एकंदरित राज्याचा महसुलच अत्यंत कमी झाला होता. त्यामुळे निधीवाटपाबाबत अनेक अडचणी आल्या. मात्र, इतर पक्षांसोबत भेदभाव केला नाही. मात्र, आता सर्व सुरळीत होत असल्याने या तक्रारीही दूर केल्या जातील, असे अजित पवार म्हणाले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

इराण भारतीय जहाजांना होर्मुझ पार करण्यास मदत करणार:अमेरिकेला म्हटले- होर्मुझवर हल्ला केला तर आखातातील कोणतेही बंदर सुरक्षित राहणार नाही

इराणवर अमेरिकेच्या नौदलाची नाकेबंदी सुरू-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात साडेतीन हजाराहून अधिक लाभार्थ्यांना मिळाला लाभ

पुणे, दि.१३: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत लोणीकंद...