जरंडेश्वर शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्याची मागणी:किरीट सोमयांनी ईडी कार्यालयात शेतकऱ्यांनाही नेले सोबत

Date:

मुंबई-जरंडेश्वर सहकारी कारखाना अजित पवारांनी बेकायदा बळकावला असल्याचा आरोप करत,हा कारखाना सभासद शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज साताऱ्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन मुंबईतील ईडी कार्यालय गाठले. ईडी अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांनी जरंडेश्वर सहकारी कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात द्या अशी मागणी केली .

दरम्यान, ईडी अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर जरंडेश्वर सहकारी कारखान्याच्या सभासदांनीही आपली भूमिका मांडली. 2010 मध्ये या कारखान्याचा लिलाव करून तो बेकायदा बळकावण्यात आला. त्यामुळे या कारखान्याचे सभासद असलेल्या 27 हजार शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. त्यामुळे हा कारखाना पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी ईडीकडे केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

ईडी अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर किरीट सोमय्या यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. साताऱ्यातील जरेंडेश्वर सहकारी साखर कारखाना अजित पवारांनी बेकायदा ताब्यात घेतला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. हा कारखाना ताब्यात घेण्यासाठी अजित पवारांनी घरातील महिला व इतर सदस्यांचा वापर केला. त्यामाध्यमातून 1200 शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली, असाही आरोप त्यांनी केला. त्यामुळे हा कारखाना अजित पवारांच्या ताब्यातून परत घेऊन तो शेतकऱ्यांना सोपवण्यात यावा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.जरांडेश्वर सहकारी साखर कारखाना 2010 मध्ये मेसर्स गुरू कमोडिटी सर्विसेस या कंपनीला विकण्यात आला होता. मात्र, कंपनीच्या मुळ किंमतीपेक्षा खूप कमी किंमतीत हा कारखाना विकण्यात आला. या व्यवहारामध्ये कायदेशीर बाबींचे पालनही करण्यात आले नाही, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच, मेसर्स गुरू कमोडिटी सर्विसेस या कंपनीशी अजित पवारांच्या कुटुंबांचा संबंध असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी यापुर्वीही ईडीकडेही तक्रार दिली आहे.

.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवसेना उबाठा पक्ष: पुण्यातील शहर नेतृत्वात फेरबदल होण्याचे संकेत

“संघटना हीच शिवसेनेची ताकद; पुण्यात ‘मिसिंग लिंक’ जोडण्याचे...

विद्यापीठ चौकातील पाणी गळती रोखण्याचे आदेश; बाणेर, हिंजवडीतील अडथळे दूर होणार!

मेट्रो-३ च्या कामासाठी 'पीएमआरडीए' 'ॲक्शन मोड'मध्ये; अतिरिक्त आयुक्तांकडून 'ग्राउंड...

‘फुलचंद पाना’तून नशेच्या गोळ्या

पुणे-पुणे पोलिसांनी 'फुलचंद पानात' नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर...

नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार

नव्या ६० केंद्रांना मंजुरी,ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२००...