पुणे- पेट्रोल डीझेल च्या वाढत्या किमतीमुळे संपूर्ण देश त्रस्त झालेला असताना आज लखनौ मध्ये होत असलेली बैठक आणि पेट्रोल डिझेलची दरवाढ यावर म्हत्वाचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडले आहे , ते ऐका त्यांच्याच तोंडून …
मराठा सेवा संघाला काय निर्णय घ्यायचा ते ठरवतील
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी एका मासिकातील लेखामधून भाजपशी युती करण्याचे सूतोवाच केले आहे. या संदर्भात पवार म्हणाले, ‘काही संघटना राजकारणविरहित विशिष्ट उद्देशाने काम करीत असतात. अनेकांना वाटते की आपण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणाशी तरी युती करावी. त्यांना काय निर्णय घ्यायचा ते ठरवतील.
सिंहगड परिसर विकास आराखडा तयार
सिंहगड परिसराचा विकास आराखडा तयार आहे. खालील भागात किल्ल्याला शोभेल असे बांधकाम करून पोलीस चौकी उभारण्यात येणार आहे. सिंहगडावर येणाऱ्या पर्यटकांची लक्षणीय असल्याने तेथे वाहनतळाची सोय करण्यात येणार आहे. याशिवाय अन्य काही सोयी सुविधा उभारण्यात येणार असून त्यासाठी १० एकर जमिनीचा वापर करण्यात येईल. दरम्यान, सिंहगड परिसरात आता टपऱ्या उभारून देण्यात येणार नाही. सुटसुटीत दुकानांची निर्मिती करून किल्ल्यावरील पर्यटनाला शिस्त लावणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.
प्रायोगिक तत्वावर ई वेहिकल सुरू
पीएमपीएमएलच्या प्रायोगिक तत्वावर ई वेहिकल सुरू करणार आहे. सद्यस्थितीत ३५ – ४५ ई बस तयार आहेत. पायथ्यापासूनवर जाण्यासाठी या वाहनांचा उपयोग होईल. त्यासाठी तिकीटही आकारले जाणार असून स्थानिक तरूणांना गाईडचे प्रशिक्षण देण्यात येणार असून युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुण्यात खेळाडूंसाठी स्वामिंग टॅंक ओपन
”पुण्यात खेळाडूंसाठी स्विमिंग टॅंक ओपन करण्याची परवानगी दिली आहे. फक्त लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या खेळाडूंनी टॅंक मध्ये जाण्याची परवानगी असणार आहे. अशी अट त्यांनी यावेळी घातली आहे.”