Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पिंपरीच्या महापौरपदी भाजपच्या नितीन काळजे उपमहापौरपदी शैलजा मोरे यांची बिनविरोध निवड

Date:

पुणे–  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या नितीन काळजे यांची आज(मंगळवारी) बिनविरोध निवड झाली. महापौर पदासाठीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्याम लांडे यांनी माघार घेतली   उपमहापौरपदी शैलजा मोरे यांचीहि यावेळी   बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादीच्या निकिता कदम यांनी माघार घेतली . पिठासीन अधिकारी दौलत देसाई यांनी या  निवडीची  अधिकृत घोषणा केली.  
काळजे हे पिंपरी महापालिकेच्या इतिहासातील भाजपचे पहिले महापौर ठरले आहेत. नितीन काळजे हे महापालिकेचे 24 वे महापौर ठरले. नव्याने समाविष्ट केलेल्या गावांनाही त्यांच्या रुपाने प्रथमच महापौर पद मिळाले आहे. आज सकाळी  भाजपच्या सर्वच नगरसेवकांनी पिंपरी-चिंचवडचे दैवत मानल्या जाणा-या  संत मोरया गोसावी यांचे दर्शन घतले. यावेळी सर्वांनी केशरी फेटे घालून महिला नगरसेवकांनाही हिरव्या रंगाच्या साड्या  व फेटे घालून महापालिकेत प्रवेश केला. यावेळी आमदार  महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, नगरसेवक मानदेव ढाके, राहुल जाधव यांनी बैलगाडी मध्ये बसून महापालिकेत प्रवेश केला.

यावेळी सभागृहात भाजपचे, राष्ट्रवादीचे शिवसेना, मनसे तसेच अपक्ष उमेदवारही हजर होते. यावेळी राष्ट्रवादी पक्षातर्फे महापौर पदासाठी अर्ज भरलेल्या शाम लांडे यांनी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली.  मावळत्या महापौर शकुंतला धराडे यांनी महापौर पदाची सर्व सूत्रे यावेळी नवनिर्वाचित महापौर नितीन काळजे यांना  दिली.

पदभार स्विकारल्यानंतर महापौर काळजे यांनी  सर्वसाधारण सभा 23 मार्च राजी दुपारी 2 पर्यंत तहकूब केली.

नवनिर्वाचित महापौर नितीन काळजे यांचा परिचय – 

नितीन काळजे यांच्या जन्म 10 मार्च 1974 चा असून त्यांचे वय 42 वर्ष आहे. त्यांचा अद्यापर्यंत विवाह न झाल्याने ते पिंपरी-चिंचवडचे पहिले अविवाहित महापौर ठरणार आहेत. ते दहावी उत्तीर्ण आहेत. त्यांचा व्यवसाय शेती असून त्यांचा विट कारखाना, वाहतूक, बिल्डींग मटेरिअल सप्लायर असे विविध व्यवसाय आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 31 वर्षाच्या इतिहासात नितीन काळजे हे पहिले अविवाहित महापौर ठरले आहेत. नितीन काळजे यांची ही दुसरी नगरसेवकपदाची टर्म आहे. 2012 सालीही त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर नगरसेवकपद मिळवले होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करत त्यांनी 2017 ओबीसी जागेवरून प्रभाग क्रमांक तीनमधून निवडणूक लढवली होती.
यावेळी सर्वच नवनिर्वाचित  नगरसेवकांच्या स्वागतासाठी उद्यान विभागातर्फे महापालिकेमध्ये फुलांची रांगोळी काढून स्वागत करण्यात आले.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बँकॉकहून पुण्यात तस्करी:10.3 कोटींचे हायड्रोपोनिक गांजा पकडला-तिघांना अटक

पुणे-डायरेक्टरेट ऑफ कस्टम डिपार्टमेंट (डीआरआय) च्या पुणे, मुंबई शाखेतील...

भारत पाकिस्तानातील शस्त्रसंधीनंतर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारने द्यावी.

भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी राजीव गांधींच्या बलिदान दिनी...