Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

नाशकात हि भाजपचे महापौर उपमहापौर बिनविरोध

Date:

नाशिक – महापालिका निवडणुकीत १२२ पैकी ६६ जागा जिंकत स्पष्ट बहुमत भाजपने मिळवल्यानंतर नाशिकमध्ये महापौर व उपमहापौरपदाच्या निवडीवर आज भाजपचा शिक्कामोर्तब झाला. भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका रंजना भानसी या नवीन महापौर म्हणून निवडून आल्या तर प्रथमेश गिते यांच्या गळ्यात उपमहापौरपदाची माळ पडली आहे.
मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक महापालिकेत आज भाजपचे महापौर आणि उपमहापौर बिनविरोध निवडून आले. महापौर आणि उपमहापौरपदासाठी घेण्यात आलेल्या या निवडणुकात महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. याप्रसंगी महापौर रंजना भानसे भावूक झाल्या. यावेळी बोलताना, ”नाशिकच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू”, असे वक्तव्य नवनिर्वाचीत महापौर रंजना भानसे यांनी केले. निकालानंतर महापालिकेच्या बाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकाच जल्लोष केला. ‘रामायण’ या महापौर बंगल्याबाहेर फटाके वाजवत तसेच बंगल्यावर भाजपचा झेंडा लावत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. पालिका निवडणुकात नाशिकरांनी खूप मोठा विश्वास भाजपवर दाखवला आहे.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अहमदाबाद विमान अपघातात सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान कोसळले आहे....

विमान अपघात:उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्राकडे केला तातडीने संपर्क

मुंबई, १२ जून २०२५ : अहमदाबाद विमानतळावर आज सकाळी...

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर...