नवी दिल्ली :उत्तर प्रदेशातील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायी चालत 300 मीटरचा रोड शो केला. त्यानंतर भाजप मुख्यालयात त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मोदी म्हणाले- “सर्व देशबांधवांना आणि कार्यकर्त्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. देशामध्ये प्रत्येक सणाकडून वाईटावर विजय मिळवून पुढे जाण्याची शिकवण मिळते.”
लोकशाहीमध्ये निवडणुका सरकार बनवण्याचा आणि लोकशिक्षणाचा महापर्व असतो. मतदानाची वाढत असलेली टक्केवारी एक शुभ संकेत आहे.
विकासासाठी गरिबांनी केलेले मतदान एका नवीन भारताचे दर्शन झाल्यासारखे आहे. उत्तर प्रदेशमधील निवडणुकीचा निकाल नवीन भारताचा पाया आहे.

मोदी पुढे म्हणाले की, “निवडणुकीचे हे निकाल ६५ टक्के तरुण वर्गाचा आणि महिलांचा नवीन भारत आहे, असा भारत जो काही मिळण्यापेक्षा काही नवीन करण्याची इच्छा निर्माण करणारा आहे. हा विचार नवीन भारताचा पाया आहे.
निवडणूक जनतेचा एक पवित्र आदेश असतो. परमेश्वराने आम्हाला या आदेशाचे पालन करता यावे एवढी शक्ती द्यावी.
झाडेही आपल्याला शिकवण देतात की, फळ लागल्यानंतर ते वाकतात. भाजपवर विजयाचे फळ लागले आहेत आणि यामुळे आपणही आणखी वाकून आणि नम्र होऊन जनतेची सेवा करणे आवश्यक आहे.
– या विजयासाठी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणींसारख्या नेत्यांनी खूप तप केले आहे. त्यांच्या इच्छेनुसार आपल्याला जनतेची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. या वर्षी पंडित दीनदयाळ यांची जन्मशती आहे. युपी त्यांची कर्मभूमी राहिली आहे. त्यांनी सांगितले होते की, गरिबांची ताकद ओळखा आणि देशाच्या निर्माणासाठी जेवढी जास्त त्यांना संधी मिळेल देश तेवढाच पुढे जाईल.
मी निवडणुकीप्रमाणे चालणार व्यक्ती नाही. 2022 मध्ये स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण होतील. आतापर्यंतच्या सर्व सरकारने देशासाठी काम केले आहे. त्यांचाही आम्ही आदर करतो. आमच्याकडे पाच वर्षांचा काळ आहे. सव्वाशे कोटी जनतेने प्रत्येक वर्षी एक नवीन संकल्प केला तर देश मागे राहणार नाही. या निवडणूक निकालांच्या माध्यमातून नवीन ताकद मिळाली आहे. देशबांधवांमध्ये विकासाचे आंदोलन पूर्ण करायचे आहे. प्रत्येक व्यक्तीला मुख्यप्रवाहाशी जोडायचे आहे.