कोरोना काळात रुग्णसेवा करणाऱ्यांचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार देवून सन्मान

Date:

पुणे – कोरोनाच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केल्याने विविध क्षेत्रातील लोकांचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे १०१ व्या जयंती निमित्ताने पुणे जिल्हा मांतग समाज समितीच्या वतीने सहकारनगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.राष्ट्रवादीचे नेते ,ज्येष्ठ नगरसेवक सुभाष जगताप, कॉंग्रेसचे अभ्यासू नगरसेवक अविनाश बागवे, राजाभाऊ धडे, संजय केंदळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

शैक्षणीक क्षेत्रात गुलाबराव नेटके तर स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनाच्या काळात मृत्यू पावलेल्यांचा अंत्यसंस्कार केल्याने किरण मोहन लोंढे यांचा सत्कार करण्यात आला . कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मातंग समाजाच्या मुले व महिलांनी शिक्षणापासून शिक्षण खंडित होवू नये म्हणून सविता थोरात आडागळे यांनी ऑनलाईन शिक्षण प्रबोधन केल्याने तसेच या दरम्यान मातंग समाजात सामाजिक प्रबोधन करणाऱ्या अंकिता दोडके, लीना लोंढे, ईशा आडागळे, पौर्णिमा लोखंडे, पल्लवी आढगळे, हर्षदा आडागळे त्यांचा सन्मान करण्यात आला. यांना स्मृतिचिन्ह शाल तसेच अण्णा भाऊ साठे समग्र वाड्मय खंड २ ची प्रत देवून गौरव करण्यात आला. यावेळी हनुमंत साठे, ऍड महेश सकट, ऍड. राजश्री अडसूळ, अनिल हातागळे, संतोष माने, संजय साठे, गणेश लोंढे, गणेश चांदणे, शाम चंदनशिवे, गणेश भालेराव विनोद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जेचा महोत्सव पुण्यात

‘मास्मा रिन्यूएबल एनर्जी एक्स्पो’ १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान पुणे, ...

केंद्र सरकारच्या कामगार कायद्याविरोधातील उद्याच्या ‘भारत बंद’ला काँग्रेसचा पाठिंबा.

मुंबई, दि. ११ फेब्रुवारी २०२६ केंद्रातील भाजपा सरकारने कामगार कायद्यात...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून जनतेची फसवणूक, वीज स्वस्त नाही तर १६% ने महाग होणार: अतुल लोंढे

महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक, तेलंगणा, गुजरातमधील वीज दर स्वस्त कसे, अदानीच्या...