पुणे :
कात्रज जाधवनगर येथील अक्सा चॅरिटेबल ट्रस्ट च्या नॅशनल पब्लिक स्कुल चा दहावी परीक्षेत पहिल्याच वर्षी शंभर टक्के निकाल लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.अमर राजू गायकवाड याने ८३ टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर जयेश महादेव कलशेट्टी याने ८० टक्के गुण मिळवून द्वीतीय क्रमांक पटकावला.
मुख्याध्यापक सौ.अंजुम फिरदौस पटेल आणि संस्थापक एडव्होकेट टी ए पटेल यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अक्सा चॅरिटेबल ट्रस्ट ही अल्पसंख्यक शिक्षण कायद्याखाली नोंद झालेली शिक्षण संस्था असून गरीब ,सर्व साधारण कुटुंबातील विद्यार्थी येथे शिकतात .संस्थेला यावर्षी प्रथमच दहावीच्या तुकडीला परवानगी मिळाली,आणि पहिल्याच वर्षी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले असे संस्थापक एडव्होकेट टी ए पटेल यांनी सांगितले.