रोहा व चाकण येथील बलात्कार व निघृण खून प्रकरणांची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात होणार

Date:

गृहमंत्री अनिल देशमुख यांचे
विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांना आश्वासन

मुंबई दि. २९ : रोहा येथील तांबडी गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि निघृण खून तसेच चाकण येथील एका युवतीला विवस्र करून खून केल्याच्या प्रकरणांमध्ये पंडितांना लवकर न्याय मिळावा, यासाठी हे खटले फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात येतील तसेच या दोन्ही प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नियुक्त करण्यात येईल असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांना दिले.
माणुसकीला काळीमा फासणा-या या दोन्ही प्रकरणांमध्ये पिडितांच्या कुटुंबियांना न्याय मिळायाला हवा व हे क्रुर कृत्य करणा-या गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याची मागणी आज विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी आज गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रालयात भेट घेऊन केली.
सामान्यपणे न्यायालयात सुनावणीस दीर्घकाळ लागतो. अनेक वर्षे खटले चालतात. त्यामुळे पीडितांना लवकर न्याय मिळण्यास विलंब होतो. म्हणून या दोन्ही प्रकरणांची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात घेण्यात यावी, त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने दोन्ही प्रकरणात विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची मागणीही दरेकर यांनी गृहमंत्री देशमुख यांच्याकडे केली. याप्रकरणी सविस्तर चर्चा झाल्यानंतर गृह मंत्री देशमुख यांनी या प्रकरणांची दखल घेत या दोन्ही प्रकरणांसाठी सकारच्यावतीने विशेष सरकारी वकील उपलब्ध करुन देऊन हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात घेण्यात येईल असे आश्वासन गृहमंत्री देशमुख यांनी दिल्याची माहिती विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी यावेळी दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सव’१५ ते १८ नोव्हेंबर दरम्यान!

-सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडून घोषणा मुंबईतील रवींद्र...

आठवड्यातून एक दिवस सर्व बांधकामे बंद ठेवा ! वायुप्रदूषण रोखण्यासाठी मंत्री आशिष शेलार यांचा प्रस्ताव

बांधकामे आणि पाडकामांना आठवड्यातून एक दिवस विश्रांती; हवेची गुणवत्ता...

पुण्यात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव; महापालिका आयुक्तांकडून खासगी रुग्णालयांना तातडीच्या उपचारांचे निर्देश!

डेंग्यू रुग्णांची IHIP पोर्टलवर नोंदणी बंधनकारक; अनावश्यक प्लेटलेट्स वापर...

पुणेकरांवर आणखी पाणीकपात लादू नका! खडकवासलात पुरेसा पाणीसाठा असल्याचा विवेक वेलणकरांचा दावा

‘सध्याची १३ टक्के पाणीकपात वाढविण्याची गरज नाही’; २५.६६ टीएमसी...