महामेट्रोला मल्टी मॉडेल हबमधून होणाऱ्या वार्षिक नफ्यातून महानगरपालिकेला ४०-५० टक्के हिस्सा मिळावा- आबा बागुल

Date:

पुणे- पेठ पर्वती स्कीम क्रमांक ३ फायनल प्लॉट क्रमांक ४९९ व ५००अ  स्वारगेट येथील २८ हजार चौ. मीटर एवढ्या क्षेत्रात  महामेट्रोला  (महाराष्ट्र मेट्रो रेल कॉरपरेशन लिमिटेड) मेट्रोस्टेशन  करण्यासाठी रेडीरेकनर दराने महामेट्रोला पुण्याची सार्वजनिक वाहतूक सुखकर व्हावी यासाठी  महानगरपालिकेने  जागा दिली आहे. सार्वजनिक हितासाठी जागा देताना  रेडीरेकनर दराने जागा देणे योग्य आहे. परंतु मेट्रोस्टेशन उभारत असताना येथे  मल्टी मॉडेल हब व्यावसायिक संकुल देखील महामेट्रो करत आहे. सदर जागेचा वापर महामेट्रोने मेट्रो स्टेशन व्यतिरिक्त  मल्टी मॉडेल हब व्यावसायिक संकुल करून नफा मिळवत असेल तर यातून होणाऱ्या वार्षिक उत्पन्नातून ४०-५० टक्के हिस्सा महामेट्रोने पुणे महानगरपालिकेला देणे बंधनकारक केले पाहिजे अशी मागणी काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी केली  
ते म्हणाले,’ पुणे शहरात अनेक जागा मेट्रो स्टेशनसाठी देण्यात आल्या आहेत. त्यापैकी   तीन ठिकाणी  मोक्याच्या जागेत महामेट्रोचा  मल्टी मॉडेल हब व्यावसायिक संकुल उभारण्याचा विचार आहे. यासर्व ठिकाणच्या व्यावसायिक संकुल मधून येणाऱ्या उत्पन्नाच्या ४०-५० टक्के हिस्सा महानगरपालिकेला मिळावा. महानगरपालिकेने महामेट्रोला दिलेल्या क्षेत्राचे ताबे पावती केलेली आहे. परंतु करारनामा झालेला नाही. करारनामा करताना सदर जागेचा व्यावसायिक हेतूने  वापर केल्यास पुणे महानगरपालिकेला होणाऱ्या वार्षिक नफ्यातून ४०-५० टक्के हिस्सा मिळावा अशी अट घालण्यात यावी किंवा ४०-५० टक्के पार्टनरशिप करावी. व स्थायी समिती मार्फत मुख्य सभेत मान्यता घेऊनच करार करावा असे आबा बागुल म्हणाले. 
महानगरपालिकेचे  नफ्याच्या दृष्टीने कार्य करणे हे उद्धिष्ट नाही. परंतु शहराला मूलभूत सुविधा देत असताना उत्पन्न वाढीसाठी विविध पर्याय शोधणे देखील महानगरपालिकेचे कर्तव्य आहे.
महानगरपालिका सार्वजनिक हिताच्या वापरासाठी महामेट्रोला हिस्यापोटी ९५० कोटी रुपये देणार आहे. त्यापैकी काही पैशाच्या स्वरूपात  व उर्वरित जागेच्या स्वरूपात वळती करण्यात येणार आहे. परंतु  सार्वजनिक हेतू सोडून महामेट्रो व्यावसायिक हेतूने येथे  मल्टी मॉडेल हब व्यावसायिक संकुल  उभारत असेल तर महानगरपालिकेला नफ्यामध्ये ४० टक्के हिस्सा असणे गरजेचे आहे.  
पुणे महानगरपालिकेचे व्यावसायिक प्रकल्प पाहणी करिता महानगरपालिकेने स्वतंत्र  कंन्सल्टंट नेमून   महानगरपालिकेला जास्तीतजास्त कसा प्रॉफिट मार्जिन मिळेल यासाठी त्याची मदत घ्यावी. महामेट्रो  मल्टी मॉडेल हबचे प्लॅन पास करताना महानगरपालिकेच्या बांधकाम नियमावलीप्रमाणे चार्जेस भरून घ्यावे. हा प्लॅन सॅंक्शन करताना महानगरपालिकेचा अधिकार देखील राखून ठेवावा. यातून महानगरपालिकेला उत्पन्नाचा मोठा स्रोत निर्माण होईल.  यासाठी आपण भूमिका घेऊन पुणे महानगरपालिकेला महामेट्रोच्या व्यावसायिक संकुलमधील एकूण वार्षिक नफ्याच्या  ४०-५० टक्के हिस्सा मिळण्यासाठी करारनाम्यात अट घालावी अशी मागणी पुणे महानगरपालिका आयुक्तांना आबा बागुलांनी दिलेल्या पत्राद्वारे केली. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मॅट्रोमोनिअलवरून वधू शोधणाऱ्या इस्त्रोच्या तोतया शास्त्रज्ञाला अटक

पुणे- मॅट्रोमोनिअल वेबसाईटवर फेक प्रोफाईल अकाऊंट बनवून महिलांची फसवणूक...