काय म्हणाले गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
मुंबई- सिल्वर ओक वरील आंदोलनात्मक हल्ल्यासंदर्भात आज गृहमंत्री वळसे पाटील यांनी धक्कादायक माहिती दिली आहे , ते म्हणाले,’ ही गोष्ट खरी आहे की ४ एप्रिल रोजी गुप्तचर विभागाने पत्र लिहून कळवलं होतं, तरी देखील कमतरता राहिली. जेवढ्याप्रमाणात बंदोबस्त ठेवायला हवा होता, तेवढा ठेवला गेला नाही. या संदर्भात चौकशी आदेशीत केलेली आहे. संबंधित पोलीस आयुक्तांची बदली केली आहे, गावदेवीच्या पोलीस निरीक्षकास निलंबित केलेलं आहे. चौकशी सुरू आहे, आणखी चौकशीत जे काही समोर येईल त्यानुसार कारवाई करू.” असंआज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.याबाबत रीतसर चौकशी सुरू आहे आणि या चौकशीत पोलिसांना जी काही माहिती मिळत आहे, ती माहिती पोलीस न्यायालयात सादर करत आहेत. त्यामुळे त्यासंदर्भात नक्की चौकशीचा भाग काय आहे, काय नाही? हे आता न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना, उघड करणे काही योग्य होणार नाही.” असं दिलीप वळेस पाटील म्हणाले आहेत.