मुंबई- किरीट सोमय्या आज व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहे. ट्विटरवर व्हिडिओ जारी करत आपल्याविरोधात कितीही आरोप केले तरी आपण दबणार नाही. महाविकास आघाडीचे घोटाळे बाहेर काढतच राहू, असे त्यांनी म्हटले आहे. तसचे, INS विक्रांतला वाचवण्यासाठी गोळा केलेल्या निधीबाबत उच्च न्यायालयात सर्व माहिती देऊ, असेही त्यांनी सांगितले आहे. मात्र, आपण सध्या कुठे आहोत याची माहिती त्यांनी दिली नाही.
केंद्राची सुरक्षा असलेले परंतु तरीही ज्यांना बेपत्ता म्हटले जाते असे भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी आज ट्विटरवर जारी केलेल्या व्हिडीओत म्हटले आहे कि,
काँग्रेसनेच INS विक्रांत भंगारात काढण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा आम्ही भाजप नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेत यास विरोध केला होता. तेव्हाच भाजपने INS विक्रांतसाठी निधी जमा करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा स्वर्गीय गोपीनाथत मुंडेदेखील आमच्यासोबत होते. त्यानंतर भाजपने निधी गोळा करण्यास सुरुवात केली. आम्ही केवळ 11 हजारांचा निधी जमा केला. मात्र, यावरून संजय राऊत वाट्टेल ते आरोप करत आहेत. त्यांनी 57 कोटींचा आकडा कुठून आणला, याबाबत अद्यापही माहिती दिलेली नाही. त्यांच्या आरोपानंतरच माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. केवळ राजकीय सुडापोटी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, यामुळे मी महाविकास आघाडीचा भ्रष्टाचार बाहेर काढणे थांबवणार नाही. INS विक्रांतसाठी जमा केलेल्या निधीबाबत आम्ही उच्च न्यायालयाला आवश्यक ती सर्व माहिती देऊ, असे किरीट सोमय्या म्हणाले.
गोपीनाथ मुंडेंचा केला उल्लेख…
“यापूर्वीही राऊत यांनी दोन महिन्यांमध्ये सात वेळा आरोप लावलेत. पण एकाचाही पुरावा त्यांच्याकडे नाहीय. मुंबई पोलिसांकडे एक कागदही नाहीय यासंदर्भात. तक्रारदार म्हणतोय की संजय राऊतांचं प्रेस स्टेटमेंट घेऊन आम्ही आलोय,” असा टोलाही सोमय्या यांनी या प्रकरणावरुन पुरावे नसल्याचा संदर्भ देत लगावलाय. “राऊत साहेब १७ डिसेंबर २०१३ ला जेव्हा आपण राष्ट्रपतींना भेटलो होतो, राज्यपालांकडे गेलो होतो त्यावेळी राष्ट्रपतींना भेटताना शिवसेनेचे मोठे नेते गोपीनाथ मुंडेंसोबत होते. तेव्हा आपण राष्ट्रतींसोबत चर्चा केली होती,” अशी आठवण सोमय्यांनी करुन दिलीय.
मुंबईच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने सोमवारी किरीट यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यांचा मुलगा नील यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय होणार आहे.