१० क्लब सहभागी
पुणे : आरोग्य व पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृतीसाठी रविवारी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. ऑक्टोबर सेवा सप्ताहांतर्गत ही सायकल रॅली काढण्यात आली.सारसबाग, टिळक रोड, डेक्कन, फर्ग्युसन रस्ता, संभाजी उद्यान या मार्गावर सायकलस्वारांनी जागृती केली.
प्रसंगी समन्वयक अनिल मंद्रुपकर, मयूर बागुल, के. के. गुजराती, किशोर मोहोळकर, संदीप गायकवाड, विश्वास सूर्यवंशी, रोहिणी नागवणकर, प्रियांका शेंडगे शिंदे, राजीव निगडीकर, शैलेश बुरसे, स्मिता देव आदी उपस्थित होते. या सप्ताहात ‘लायन्स’च्या ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी, पुना वेस्ट, फ्युचर, विधिज्ञ, मुकुंदनगर, शिवाजीनगर, सुप्रिम, पुणे रिव्हर साईड, मैत्री या क्लबने सहभाग घेतला आहे. या रॅलीचा समारोप संभाजी उद्यानात झाला.
अनिल मंद्रुपकर म्हणाले, “कार्बन उत्सर्जन रोखणे, निसर्गाचे संवर्धन, प्रदूषण कमी करणे, स्वच्छ आणि निरोगी जीवन याबाबत जागृती करण्यात आली. ‘जॉईन ग्रीन रिव्होल्यूशन, स्टॉप पोल्युशन’ हा नारा होता. सायकलचा वापर वाढवून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासह चांगले आरोग्य राखणे हेही यातून सांगण्यात आले.”