पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 59 हजार 930;एकुण 7 हजार 146 रुग्णांचा मृत्यू

Date:

पुणे विभागातील 2 लाख 70 हजार 296 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले, विभागात कोरोना बाधित 2 लाख 03 हजार 220 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे,दि.6 :- पुणे विभागातील 2 लाख 70 हजार 296 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 03 हजार 220 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 59 हजार 930 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 7 हजार 146 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.64 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 75.18 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 88 हजार 566 रुग्णांपैकी 1 लाख 51 हजार 117 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 33 हजार 65 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 384 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.32 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 80.14 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 17 हजार 663 रुग्णांपैकी 10 हजार 471 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 719 आहे. कोरोनाबाधित एकूण 473 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 20 हजार 170 रुग्णांपैकी 14 हजार 990 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 372 आहे. कोरोनाबाधित एकूण 808 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 16 हजार 262 रुग्णांपैकी 8 हजार 702 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 927 आहे. कोरोनाबाधित एकूण 633 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 27 हजार 635 रुग्णांपैकी 17 हजार 940 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्णसंख्या 8 हजार 847 आहे. कोरोनाबाधित एकूण 848 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 6 हजार 593 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 50 सातारा जिल्ह्यात 875, सोलापूर जिल्ह्यात 435, सांगली जिल्ह्यात 612 तर कोल्हापूर जिल्ह्यात 621 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 12 लाख 71 हजार 803 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 70 हजार 296 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 5 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कात्रजच्या घाटात एसटी बस आणि ऑटो रिक्षा ची समोरासमोर धडक, रिक्षाचालक ठार

पुणे: पुण्यातील कात्रज घाट परिसरात गुरुवारी (दि. 23 एप्रिल...

नाले सफाई, ड्रेनेज सफाई बाबत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही – महापौरांचा इशारा

पुणे- पावसाळ्यात नाले सफाई आणि ड्रेनेज सफाई न झाल्याने...

वंचित विशेष मुलांसाठी मामाच्या गावची सफर-सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे आयोजन

पुणे : दरवर्षीप्रमाणे मामाच्या गावाला जाण्याची ओढ आणि एकदा...