महाकाली गुंफाची एक इंचही जागा विकू देणार नाही…विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

Date:


मुंबई- महाविकास आघाडी सरकारने अंधेरी येथील महाकाली गुंफा बिल्डरला विकण्याचा घाट घातला आहे. सुमारे २ हजार वर्षांपुर्वीच्या या गुंफा व मंदिराचा टीडीआर बिल्डरला आंदण देण्याचा निर्धार करणा-या ठाकरे सरकारच्या या बेकायदेशीर कृतीचा निषेध आज भाजपाच्यावतीने करण्यात आला. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आज महाकाली गुंफा येथे सरकारच्या कृतीचा निषेध करण्यात आला. यावेळी हा प्रकरणाचा पाठपुरावा करणारे भाजपाचे नते किरिट सोमैय्या यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिल्डरच्या चरणी लोटांगण घालण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करित असून मुंबईची एक इंचही जागा बेकायदेशीरपणे बिल्डरला विकू देणार नाही व असा कोणीही प्रयत्न केला तर त्याची किंमत ठाकरे सरकारला मोजावी लागेल असा जोरदार इशारा प्रविण दरेकर यांनी आज दिला.
मुंबई महापालिका व ठाकरे सरकारने खाजगी बिल्डर शाहिद बालवा, अविनाश भोसले व विनोद गोएंका यांना अंधेरी येथील सुमारे २००० वर्ष जुन्या महाकाली गुंफा व मंदिरचा जागेचा टी डी आर देण्याचा निर्धार केला आहे. विरोधी पक्ष नेते दरेकर व सोमैय्या यांनी आज त्या जागेची पाहणी केली. तेथील स्थानिक नागरिकांशी संवाद साधला व तेथील वस्तुस्थिती जाणून घेतली. मुंबई महापालिका व सरकारच्या बेकायदेशीर कृतीचा यावेळी भाजपाच्यावतीने निषेध करण्यात आला. ठाकरे सरकारचा निषेध असो…आघाडी सरकार हाय हाय…अशा जोरदार घोषणाबाजी भाजपाच्यावतीने करण्यात आली.
यावेळी बोलताना प्रविण दरेकर यांनी सांगतिले की, ठाकरे सरकार मुंबई विकायला निघाली आहे. येथील स्थानिकांच्या विकासाकडे लक्ष दयायला सरकारला वेळ नाही. पण येथील टीडीआरच्या माध्यमातून सुमारे २०० कोटी बिल्डरच्या घशात कसे जातील याकडे सरकारचे जास्त लक्ष आहे. आज झोपडीत राहणाऱ्याला, चाळीत राहणाऱ्याला, गोरगरिबाला घर घेण्यात अडचणी येत आहे. त्यांची काळजी नाही या ठाकरे सरकारला नाही, त्यांचा विकास रखडला आहे. त्यांच्यासाठी विशेष काही करायचं नाही परंतु सत्तेसाठी बिल्डरपुढे लोटांगण घालण्याचे काम या सरकारचा सुरु असल्याची टीकाही दरेकर यांनी यावेळी केली.
सरकार सत्तेत आल्यापासून मराठी अस्मिता विसरली आहे. सरकराच्या संवेदना मेलेल्या आहेत. ठाकरे सरकारची भूमिका ही केवळ सत्ता टिकविणे हीच आहे. मात्र भाजप नेहमी जनतेच्या पाठीशी आहे, म्हणूनच जेव्हा येथील नागरिकांवर अन्याय होत आहे, तेव्हा आम्ही आज येथे आलो. मुंबईच्या इंच इंच जागेच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ, पण मुंबईची जागा कोणालाही बेकायदेशीररित्या विकू देणार नाही असेही दरेकर यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी मुंबई भाजप जिल्हा अध्यक्ष संतोष मेढेकर, मुंबई भाजप उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, नगरसेवक पंकज यादव, नगरसेविका प्रिती साटम व भाजप महामंत्री मुरजी पटेल, पदाधिकारी अशोक गोगरी,संदीप दुबे, रमण झा, सुभाष दरेकर, शेखर तावडे यांच्यासह हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वंदे भारत एक्स्प्रेसला आज सायंकाळी पुणे रेल्वे स्टेशनजवळ अपघात

कोच नं सी 15 रुळावरून घसरला पुणे-वंदे भारत एक्स्प्रेसला आज...

बुधवार पेठ भागातील कुंटणखान्यासाठी वापरण्यात आलेले फ्लॅट सिल: ३ बांगलादेशी महिलांना अटक

पुणे-पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत मोठी कारवाई करत अनैतिक मानवी...