Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

लेखकांच्या ना हरकत पत्राशिवाय चित्रपटांना अनुदान नाही !

Date:

मुंबई – कोणत्याही निर्मात्याकडून चित्रपटलेखकांची मानधन व श्रेयाच्याबाबतीत फसवणूक होऊ नये, यासाठी लेखकाचे ना हरकत पत्र असल्याशिवाय कोणत्याही मराठी चित्रपटाला अनुदान दिले जाणार नाही, त्या दृष्टीने शासकीय पातळीवरुन नक्की कार्यवाही करण्यात येईल, असे आश्‍वासन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना. श्री. विनोद तावडे यांनी मानाचि लेखक संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले. मानाचिच्या सहकार्याने राज्यभरात विविध विद्यापीठांच्या माध्यमातून नवोदित लेखकांसाठी कार्यशाळा घेण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.
मालिका, नाटक व चित्रपट माध्यमांतील लेखकांच्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र आलेल्या ‘मानाचि’ लेखक संघटनेच्या शिष्टमंडळाने सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. तावडे यांची भेट घेऊन लेखकांच्या समस्या मांडल्या. मानाचिचे अध्यक्ष सचिन दरेकर, उपाध्यक्ष राजेश देशपांडे, सचिव श्रीनिवास नार्वेकर, लेखिका मनिषा कोरडे, ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, लेखक विवेक आपटे, चित्रपट समीक्षक श्रीकांत बोजेवार यांचा शिष्टमंडळात सामावेश होता.
लेखक हा चित्रपटाचा मुलभूत घटक असूनही चित्रपट लिहून पूर्ण झाल्यानंतर अनेक वेळा निर्मात्याकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि मानधन व श्रेय याबाबतही टाळाटाळ केली जाते, याकडे शिष्टमंडळाने श्री. तावडे यांचे लक्ष वेधले. ही फसवणूक टाळण्यासाठी निर्मात्यांना लेखकाचे ना हरकत पत्र अपरिहार्य करावे व त्याशिवाय त्या चित्रपटाचा अनुदानासाठीही विचार करण्यात येऊ नये, तसेच लेखकाच्या ना हरकत पत्राशिवाय चित्रपट सेन्सॉरसंमत न होण्याच्या दृष्टीनेही केंद्रीय स्तरावर शासनाच्या वतीने शिफारस करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.
मालिका व अन्य लेखनाच्या स्वामीत्व हक्कांबाबत लेखकांवर होणार्‍या अन्यायाकडेही शिष्टमंडळाने लक्ष वेधले. नव्या लेखकांच्या जडणीघडणीसाठी मानाचिची उद्दीष्टपूर्ती करणार्‍या उपक्रमांना आपण नेहमीच सहकार्य करु, असे सांगून श्री. तावडे यांनी नव्या उदयोन्मुख व होतकरु लेखकांसाठी राज्यभरात बीएमएम महाविद्यालयांच्या सहकार्याने महाविद्यालयीन, विद्यापीठीय पातळीवर लेखन मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्याची सूचना केली. नेमकेपणाने विचारपूर्वक वापर करण्यात आल्यास कमी आसन क्षमतेची एलईडी यंत्रणा असलेली नाट्यगृहे उभारण्याचा विचार करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्याकरणाला भाषा विज्ञानाची जोड हवी : प्रा. यास्मिन शेख

शंभरी पार केलेल्या प्रा. यास्मिन शेख यांचा सुहृदांच्या उपस्थितीत...

“शेतकऱ्यांचे संरक्षण अत्यावश्यक, हिंगोलीत बोगस खत विक्री प्रकरणी तातडीने कारवाई करा”

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कृषी विभागाला सूचना हिंगोली, दि....