महापालिकेच्या सेंटरमध्ये रूग्णांना औषधे नाही नातेवाईकांचे हाल -महाविकास आघाडीचा आरोप

Date:

पुणे- महापालिका रुग्णालयात आणि कोविड केअर सेंटर मध्ये रुग्णांना औषधे दिली जात नसून त्यांना बाहेरून आणायला भाग पाडली जात आहेत , खाजगी रुग्णालयांचे बेड ताब्यात घेणार ,घेणार ..म्हटले जाते पण त्याबाबत अंधार आहे.खाजगी रुग्णालयांच्या बिल आकारणी बाबत अंधार आहे . महापालिकेचा हा कारभार रुग्णांचा व त्यांच्या नातलगांचा हाल अपेष्टा वाढविणारा ठरत असल्याचा आरोप महाविकास आघाडी तर्फे महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या सौ दीपाली प्रदीप धुमाळ, काँग्रेस पक्ष नेते आबा बागुल, शिवसेना पक्षनेते पृथ्वीराज सुतार यांनी केला आहे

या संदर्भात त्यांनी प्रसिद्धीस पाठविलेल्या पत्रकात असेही म्हटले आहे कि ,’कोरोनाचा संसर्ग पुणे शहरात दिवसेंदिवस वाढत असून प्रतिदिन ६ हजारापर्यंत कोरोना बाधित रूग्ण आढळून येत आहेत. पुणे महापालिकेकडून कोरोना बाधितांवर उपचार करणेसाठी मनपाची रूग्णालये व सीसीसी सेंटर्स उभारण्यात आली आहेत. यामध्ये कोरोना बाधितांवर उपचार केले जात असून रूग्णास आवश्यक असणारी औषधे (उदा.रेमडिसिवर इंजेक्शन) हे रूग्णांच्या नातेवाईकांना इतर मेडिकल मधून आणणेस सांगितले जात आहे. वास्तविक एखादा रूग्ण रूग्णालयात दाखल झाला असता त्यावर उपचारासाठी आवश्यक सर्व प्रकारची औषधे त्याठिकाणी उपलब्ध असणे हे कायदयाने बंधनकारक आहे. यासाठी महापालिकेकडून कोटयावधी रूपये खर्च केले जातात. महापालिकेकडून सुविधा पुरविण्यासाठी व खरेदीसाठी कलम ६७ (३)(क) याचा वापर देखील चालू आहे. असे असतानाही रूग्णास आवश्यक असणारी औषधे (उदा.रेमडिसिवर इंजेक्शन) हे रूग्णांच्या नातेवाईकांना इतर मेडिकल मधून आणणेस सांगणे ही दुर्देवी बाब आहे. सदर बाब आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही माहिती घेतली असता पुणे शहरात रेमडिसिवर इंजेक्शनचा काळा बाजार चालू आहे असे स्पष्ट झाले आहे. सदर बाब आम्ही लेखी पत्राद्वारे आयुक्त, पुणे महानगरपालिका यांच्या निदर्शनास आणली आहे. रेमडिसिवर इंजेक्शन व इतर औषधे वेळेवर न मिळाल्याने व मिनी लॉकडाऊनच्या पाश्र्वभूमीवर रूग्णांच्या नातेवाईकांचे हाल होतात, काही नागरिकांची प्रचंड धावपळ होते. कालच पुणे मनपाच्या बाणेर येथील सीसीसी सेंटर/रूग्णालयातील तरूण रूग्णास रेमडिसिवर इंजेक्शन न मिळाल्याने त्याचे प्राण जातात का काय अशी परिस्थिती उदभवली होती. यावेळी सदर इंजेक्शन उपलब्ध करणेस प्रचंड धावपळ झाली.

पुणे महानगरपालिकेने खाजगी रूग्णालयातील ८० टक्के बेड ताब्यात घेतले अशा वर्तमानपत्रात बातम्या प्रसिध्द झाल्या, महापालिकेने याबाबत लेखी आदेश पारित केले. परंतू सदरचे बेड मनपाच्या प्रत्यक्षात ताब्यात आलेले नाहीत असे डॅशबोर्डवरून दिसून येते. हे ८० टक्के ताब्यात आलेले बेड डॅशबोर्डवर का दिसत नाही याचा लेखी खुलासा मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. पुणे शहरात एकही व्हेंटिलेटर/आयसीयु/ऑक्सिजन बेड शिल्लक नाही अशा बातम्या येत आहेत. तसेच मनपाने ताब्यात घेतलेल्या खाजगी रूग्णालयांमध्ये जे रूग्ण उपचारासाठी स्वतःहून दाखल होतात त्यांच्यावरील उपचाराच्या खर्चाचे व मनपाने संदर्भित केलेल्या रुग्णांच्या खर्चाचे नियोजन कसे व कोण करत आहे याबाबत महापालिकेकडून खुलासा व्हावा अशी मागणी महाविकास आघाडी तर्फे विरोधी पक्षनेते सौ दीपाली प्रदीप धुमाळ, काँग्रेस पक्ष नेते आबा बागुल, शिवसेना पक्षनेते पृथ्वीराज सुतार यांनी केली आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शंभरावे साहित्य संमेलन पुण्यातच

पुणे बाल पुस्तक जत्रेचे व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...

साधू वासवानी पुलासाठी जलवाहिनी स्थलांतरात बदल; अतिरिक्त कामासाठी २ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी पूल उभारणीच्या कामात...

घनकचरा व्यवस्थापनासाठी बीआरसी वाहन खरेदीचा ८.२१ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महापालिकेकडून...