- नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, ६८ बाटल्या रक्त संकलन.
पुणे- भारतीय जनता पक्षाच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त कोथरूड मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडकरांना केले होते. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात एकूण ६८ बाटल्या रक्त संकलित झाले.
सध्या राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यातच रुग्णांवर उपचारासाठी रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीने दि. ६ एप्रिल रोजी वर्धापन दिनानिमित्त सकाळी ९ ते ३ यावेळेत आ. चंद्रकांत पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करुन कोरोना रुग्णांना नवसंजीवनी देण्याचे आवाहन श्री. पाटील यांनी यावेळी केले होते. याला कोथरुडकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण ६८ बाटल्या रक्त संकलन झाले