निवडणुका जिंकणे हा भाजपचा उद्देश नसून देशाला वैभवापर्यंत नेऊन जगातील सुपर पॉवर बनविण्याचे ध्येय-चंद्रकांत पाटील

Date:

  • भाजपचा ४१ वा वर्धापनदिन साजरा.

पुणे – या पुढील काळात राजकीय आणि वैचारीक लढा भाजप विरोधात अन्य पक्ष असा होणार आहे. त्यासाठी संघटनात्मक वाढीबरोबर कार्यकर्त्यांमध्ये वैचारीक स्पष्टता निर्माण करायची आहे. केवळ निवडणुका जिंकणे हा भाजपचा उद्देश नसून देशाला वैभवापर्यंत नेऊन जगातील सुपर पॉवर बनविण्याचे ध्येय असल्याचे विचार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

भाजपच्या ४१ व्या वर्धापनदिनानिमित्त शहर कार्यालयात आयोजित केलेल्या ध्वजारोहन कार्यक‘मानंतर आयोजित केलेल्या व्हर्च्युअल रॅलीत श्री. पाटील बोलत होते. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, सरचिटणीस राजेश पांडे, गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे, दीपक पोटे आणि पदाधिकारी उपस्थित होते.

शहराध्यक्ष मुळीक म्हणाले, ‘भाजप ही देशासाठी काम करणारा पक्ष आहे. गोरगरीबांची दुःख दूर करणारी संघटना अशी पक्षाची ओळख आहे. सर्वसामान्य कार्यकर्ते पक्षाला पुढे नेत आहेत. अन्याया विरोधातील संघर्षाचा वारसा पुढे सुरू आहे. कोरोनावर मात करण्यासाठी शहर भाजपच्या वतीने संघटना स्तरावर लसीकरणाची मोहीम व्यापक करण्याची मोहीम आजपासून सुरू केली आहे. यासाठी नोंदणी, जनजागृती आणि मार्गदर्शन या तीन स्तरावर स्थानिक पातळीवर काम करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक, अपंगांना लसीकरणासाठी मदत केली जाणार आहे.’

खासदार बापट म्हणाले,‘भाजप जगातील एक नंबरचा पक्ष आहे. या पक्षाला वैचारीक बांधिलकी आहे. देश, धर्म, समाज आणि समाजातील सामान्य माणसाचा विचार करून पक्ष कार्य करीत आहे. लोकशाहीत राजकीय जीवनात कसे काम करावे याचा आदर्श या पक्षाने घालून दिला. कार्यकर्ता हा पक्षाचा प्राण आहे. वैचारीक बैठक पक्की असल्याने पक्ष कधी थांबला नाही. देशापेक्षा कोणी मोठा नाही हा आदर्श घालून दिला. आजचा दिवस संकटावर मात करणारी उर्जा देणारा आणि कर्तव्याची जाणीव करून देणारा आहे.’

महापौर मोहोळ म्हणाले, ‘भाजपचा कार्यकर्ता असल्याचा अभिमान आहे. देशाच्या प्रगती आणि राष्ट्रवादाचा प्रवास म्हणजेच भाजपचा प्रवास आहे. लोकांचा विश्‍वास संपादन करण्यात भाजप यशस्वी ठरला आहे. अविरतपणे जनतेची सेवा करीत आहोत. या पक्षाची उभारणी वंशपरंपरेवर झालेली नसून विचार आणि तत्त्वावर आधारित आहे.’

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शंभरावे साहित्य संमेलन पुण्यातच

पुणे बाल पुस्तक जत्रेचे व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...

साधू वासवानी पुलासाठी जलवाहिनी स्थलांतरात बदल; अतिरिक्त कामासाठी २ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी पूल उभारणीच्या कामात...

घनकचरा व्यवस्थापनासाठी बीआरसी वाहन खरेदीचा ८.२१ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महापालिकेकडून...