लसीकरणापासून राज्यात एकही बालक वंचित राहू नये-उपमुख्यमंत्री अजित पवार

Date:

पुणे जिल्ह्यात 11 लाख 32 हजार 351 बालकांना पोलिओ लसीकरणाचे उद्दिष्ट

बारामती दि. 31 :- राज्यातून, देशातून पल्स पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम नियमित राबवण्यात येत आहे, आज उद्घाटन झालेल्या लसीकरण मोहिमेत ५ वर्षांपर्यंतच्या प्रत्येक बालकाला लस पाजण्यात यावी, एकही बालक लसीकरणापसून वंचित राहू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना प्रतिबंधक लस पाजण्याच्या जिल्हास्तरीय लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज बारामती महिला रुग्णालयात बालकांना पोलिओ डोस पाजून झाला. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, पुणे जिल्हयात मोहिमेत सुमारे 11 लाख 32 हजार 351 बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार आज जिल्ह्यात 6 हजार 700 बुथवर लसीकरण करण्यात येत आहे. 6 हजार 254 पथकांच्या मदतीने गृहभेटी देऊन लसीकरणाची मोहिम राबवण्यात येत आहे. आपल्या घरच्या, शेजारच्या, परिसरातल्या पाच वर्षांपर्यंतच्या प्रत्येक बालकाला लस पाजली जाईल, याची खात्री करावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.

बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ.चेतन खाडे, डॉ. शिंपी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, विशेष कार्य अधिकारी हनुमंत पाटील, बारामती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे आदी यावेळी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

देशभर पावसाचा कहर; वसईत रस्त्याला नदीचे रूप, २० कार पाण्याखाली

गुजरातमध्ये कॉलनीत चालली बोट; १३ राज्यांना मुसळधार पाऊस आणि...

भारत–जपान तंत्रज्ञान सहकार्याला पुण्यात नवी गती; पुढील पाच वर्षांत १,००० हून अधिक आयटी रोजगारांची संधी

पुणे | प्रतिनिधी पुणे शहर भारत–जपान तंत्रज्ञान सहकार्याचे महत्त्वपूर्ण केंद्र...

पावसाळी गटारे म्हणजे शहराची जीवनवाहिनी… ती बंद झाली की रस्तेच बनतात तलाव!

ऑपरेशन पावसाळी गटारे – भाग २ ड्रेनेज वेगळे... पावसाळी गटारे...