गुंड निलेश घायवळला माेक्का अंतर्गत अटक

Date:

पुणे – कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि त्याचे टाेळीवर पुणे पाेलीसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम(माेक्का) नुसार कारवाई करत मंगळवारी सकाळी येरवडा कारागृहातून त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.पुणे ग्रामीण पाेलीसांनी नुकतेच त्याच्यावर एक वर्षासाठी एमपीडीए कायद्यानुसार स्थानबध्दतेची कारवाई केली.

नीलेश बन्सीलाल घायवळ (वय ४४), संतोष आनंद धुमाळ (वय ३८) व मुसाब ऊर्फ मुसा इलाही शेख (वय २९) अशी अटक केलेल्याचे नावे आहेत. तर कुणाल, कंधारे, अक्षय गोगावले, विपुल माझीरे व इतर तिघांवर मोक्कानुसार कारवाई केली असून ते फरार आहेत

काेथरुड येथे राहणाऱ्या एका गॅरेज चालक इसमाकडून भाऊच्या रॅलीसाठी गाडी पाहिजे असे म्हणून जबरदस्तीने निलेश घायवळचा प्रमुख हस्तक संताेष धुमाळ व साथीदारांनी तीन लाख रुपये किंमतीची महिंद्रा कंपनीची 550 माॅडेलची जीप जबरदस्तीने त्यास चाॅपरचा धाक दाखवून धमकावून नेली हाेती. याप्रकरणी आराेपींवर काेथरुड पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्हयातील आराेपींनी संघटित गुन्हेगारी टाेळी निर्माण करुन एकटयाने व संयुक्तरित्या स्वत:चे व टाेळीचे वर्चस्व निर्माण करण्याकरिता व त्यातून आर्थीक व इतर फायदा मिळविण्याकरिता गुन्हे केले आहे. टाेळीचे वर्चस्व व दहशत कायम ठेवण्याचे उद्देशाने संघटीत गुन्हेगारी कृत्य सातत्याने चालु ठवेलेले आहे.

टाेळीचे वर्चस्वाकरिता खुन, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जखमी करुन जबरी चाेरी, घातक शस्त्र बाळगणे यासारखे गुन्हेगारी कृत्य आराेपी सातत्याने केले आहे. निलेश घायळ याचेवर आतापर्यंत दाेन खुनाचे गुन्हासह एकूण 14 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे. सदर कारवाई खंडणी विराेधी पथकाचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पाेलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, श्रीकांत चव्हाण यांचे पथकाने केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

 बागेश्वर बाबाचा वक्तव्यांबाबत सारवासारव करत माफीनामा

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या...

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार बायपास, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मेला उद्घाटन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मिसिंग लिंकचा कामाची पाहणीघाटातील...

CM फडणवीसांना लाज वाटली पाहिजे-सपकाळ यांचा प्रहार

मुंबई-धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे...

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मेंदूविकार, अस्थिरोग, कॅन्सरवरील उपचार देण्याचा मानस : प्रकाश आबिटकर

पुणे, दि.२६: आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेप्रमाणेच महात्मा...