खासदार वंदना चव्हाण यांच्या खासदार निधीतून बी जे वैद्यकीय महाविद्यालयात ९२ लाखाची विकास कामे

Date:

भावी वैद्यकीय  व्यावसायिकांच्या शिक्षणासाठी मूलभूत सुविधा देण्याची गरज :खा . वंदना चव्हाण 
unnamed1
 
पुणे :
 
राष्ट्रवादी काँग्रेस च्या शहराध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य एड . वंदना चव्हाण यांच्या खासदार निधीतून पुण्यातील बी . जे . वैद्यकीय महाविद्यालयात ९२ लाख रुपये खर्चाची  विविध विकासकामे करण्यात आल्याने वसतिगृहातील विध्यार्थी आणि विद्यार्थिनींना दिलासा मिळाला आहे . 
 
वसतिगृहातील अंतर्गत रस्ते ,२ पार्किंग शेड ,३ कंपाऊंड वॉल आणि २ प्रतिक्षालये अशी विविधकामे या निधीतून पूर्णत्वास गेली आहेत . या विकासकांमांचे उदघाटन खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते झाले .  यावेळी डॉ  मुरलीधर तांबे   (प्रभारी अधिष्ठाता ,बै. जी. शा. वै. महाविद्यालय  ),डॉ.अजय तावरे (अधीक्षक ससून सर्वोपचार रुग्णालय ) माजी आमदार कमल ढोले – पाटील,नगरसेवक रवींद्र माळवदकर,माजी महापौर मोहनसिंग राजपाल,अशोक राठी,भाई कात्रे,मनाली भिलारे,नितीन जाधव,विपील म्हैसुरकर,संतोष बेंद्रे,युसुफ शेख,मिलिंद बालवडकर,शीतल घाटगे,शिल्पा भोसले,डॉ. अमोल शिंदे (उपअधिक्षक ,ससून सर्वोपचार रुग्णालय व  वसतिगृह प्रमुख),डॉ. अनिकेत माने ,( जनरल सेक्रेटरी ),डॉ. अतुल ढाकणे तसेच विधार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते

 एकूण 7 कामांचा उद्घाटन समारंभ पार पडला .

 कार्यक्रमानंतर खासदार वंदना चव्हाण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व समस्या जाणून घेतल्या .त्या म्हणाल्या,’ या वैद्यकीय महाविद्यालयातून  राज्यात सर्वदूर भागात डॉक्टर्स सेवेसाठी जातात . त्यांच्या विद्यार्थी दशेत समाजाने त्यांना मूलभूत दैनंदिन सोयी -सुविधा देण्याची गरज आहे . चांगले भावी  वैद्यकीय व्यावसायिक  घडवायचे असतील तर त्यांच्या शिक्षण काळातील समस्याही सोडविल्या पाहिजेत ‘

विद्यार्थ्यांमधुन अनिकेत माने व अतुल ढाकणे  यांनी  भाषण केले . अतुल ढाकणे म्हणाले ,’खासदार वंदना चव्हाण यांनी  केलेल्या उपयुक्त  कामांमुळेमधे वसतिगृहात मूलभूत सोयी झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याची भावना असून भविष्यात  सर्व डॉक्टर्स रुग्णसेवेसाठी  कटिबद्ध राहतील व सर्व विद्यार्थ्यांनी  समाजसेवा करण्याची प्रेरणा घेतली आहे .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महसुली अथवा महत्वाच्या खात्यात एकतर्फी बदल्या करण्यात येऊ नयेत:काँग्रेसचे नेते चंदुशेठ कदम यांचा विधी समितीत प्रस्ताव

पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या नियतकालिक बदली व्यतिरिक्त महसुली खात्यात...

काँग्रेसचे अभय छाजेड अपघातात जखमी

पुणेकाँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी, माजी शहराध्यक्ष, माजी नगरसेवक अभय छाजेड...

पुण्यात उष्णतेच्या लाटेचा तडाखा;गॅस्ट्रो आणि टायफॉइडच्या रुग्णांमध्ये वाढ

पुणे-पुणे जिल्ह्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसच्या...