अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने उल्लेखनीय कार्य करणार्या संस्थांचा कृतज्ञता सन्मान
पुणे :
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या संस्थांचा राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे सन्मान करून त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहर संघटक मनाली भिलारे यांनी हा उपक्रम राबविला. पर्यावरण क्षेत्रातील ‘नेचर वॉक’, संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘विज्ञान आश्रम’, कला क्षेत्रातील ‘नृत्यभारती कथ्थक डान्स अकादमी’, सामाजिक क्षेत्रातील ‘एकलव्य न्यास,’ आणि शैक्षणिक क्षेत्रातील अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, या संस्थांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन कृतज्ञता सन्मान देऊन गौरविण्यात आले. युवती काँग्रेसच्या युवतींनी संबंधित संस्थांमध्ये प्रत्यक्ष जाऊन त्यांचा गौरव केला.
याप्रसंगी भिलारे यांच्यासमवेत तेजवंती कपले, शिवानी माळवदकर, कृतिका चिवटे, सानिका उभे, अपेक्षा ठोंबरे आदी उपस्थित होत्या.