Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

भामा आसखेडचे काम आमदार, खासदारांनी अडविले -बाप्पू पठारे (व्हिडीओ)

Date:

निवेदन घेण्यास आयुक्त न आल्याने प्रशासनाचा निषेध
 पुणे- शहराच्या पूर्व भागातील पाणी समस्या सोडविण्यासाठी आखण्यात आलेल्या भामाआसखेड योजनेचे काम ठप्प पडल्याने आज (शुक्रवार) राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच या आंदोलनाबाबत कळवूनही निवेदन घेण्यास आयुक्त व इतर कोणीही न आल्याने प्रशासनाचाही तीव्र निषेध करण्यात आला.माजी आमदार बापूसाहेब पठारे, यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक महेंद्र पठारे, भैय्यासाहेब जाधव, संजिला पठारे, सुमन पठारे, वडगावशेरी विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज शुक्रवारी सकाळी अकरा वाजता चंदननगर येथे टाटा गार्डरूम पाण्याची टाकीजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.पुणे शहरातील पूर्व भागातील पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. अपुरा पाणी पुरवठा व समस्या सोडविण्यासाठी भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याची योजना आखण्यात आलेली होती. या पाईपलाईन मुळे पूर्व भागातील जनतेचा पाणी प्रश्न पूर्णपणे सुटण्यास मदत होणार आहे. त्यासाठी पाईपलाईनचे काम सुरू करण्यात आले. परंतु सद्यस्थितीत हे काम अडविल्यामुळे पूर्णपणे ठप्प झालेले आहे. योजनेचे काम पूर्ण न झाल्यास नागरिकांना भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी भामाआसखेड योजनेचे काम तातडीने सुरू करावे या मागणीसाठी राष्ट्रवादीकडून हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाबाबत आयुक्त कुणाल कुमार यांना पूर्वकल्पना देऊनही निवेदन स्वीकारण्यास प्रशासनाकडून कोणीही न आल्याने प्रशासनाचा देखील यावेळी तीव्र निषेध करण्यात आला.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारी बँकांनी ग्राहक आणि लोकाभिमुख व्हायला हवेउपमुख्यमंत्री अजित पवार

रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा...

संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती.. म्हणून पत्रा चाळ ED: शरद पवारांची फटकेबाजी

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला...

तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

मुंबई “जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड...