‘शहरातील महिला स्वच्छतागृहांची संख्या केवळ 68: खा. वंदना चव्हाण

Date:

 पुणे :
‘पुणे शहराचा विचार केला तर सध्या महिलांची लोकसंख्या 17 लाखांहून अधिक झाली आहे. गर्दीच्या ठिकाणी किंवा प्रमुख रस्त्यांवर सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या अत्यल्प असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीतून दिसून येते. उपलब्ध स्वच्छतागृहांमध्ये सोयी सुविधांचा अभाव दिसतो. त्यामुळे नवीन स्वच्छतागृहे बांधण्याआधी उपलब्ध स्वच्छतागृहांची देखभाल, डागडूजी करणे, तेथे आवश्यक सोयींची उपल्बधता करणे अधिक आवश्यक आहे. महिला, युवती यांच्या नागरी समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहेत. याप्रश्‍नाकडे दुर्लक्षच होत राहील्यास वेळप्रसंगी आम्ही आंदोलन करू’, असे शहराध्यक्ष व खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण म्हणाल्या.
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. ही पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेस, पक्ष कार्यालय, हिराबाग चौक येथे शनिवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्ष मनाली भिलारे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अशोक राठी, युवती पदाधिकारी तेजवंती कपले, स्नेहल शिनगारे,कृतिका चिवटे, मिताली जाधव उपस्थित होत्या.
यावेळी मनाली भिलारे यांनी शहर परिसरात केलेल्या सर्वक्षणांची माहिती छायाचित्रांच्या माध्यमातून दिली. त्यांनी आणि युवती काँगे्रसच्या कार्यकर्त्यांनी शहर परिसरातील महिला स्वच्छतागृहांची पाहणी केली होती. तसेच नितीन उर्फ बबलू जाधव यांनी पुरुष सार्वजनिक स्वच्छतागृहांचे सर्वेक्षण केले. या स्वच्छतागृहांची अवस्था देखील दयनीय आहे.
परिषदेदरम्यान बोलताना खा.वंदना चव्हाण पुढे म्हणाल्या, ‘जोपर्यंत अस्तित्वात असलेली स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवली जात नाहीत किंवा त्यांची निगराणी राखण्यात यश मिळत नाही तोपर्यंत नवीन स्वच्छतागृहे बांधण्यास लोकांकडून विरोध होईल. स्वच्छतागृहामध्ये ‘चेक लिस्ट’ असली पाहीजे. जेणेकरून साफसफाईचे आराखडे समजतील. प्रशिक्षित महिला सफाई कामगारांची भरती आवश्यक आहे. स्वच्छतागृह दत्तक योजना, महिला सूरक्षा पॉलिसी, महिला बचत गटाद्वारे स्वच्छतागृहांची देखरेख याबाबी प्रामुख्याने अमलात याव्यात.’
मनाली भिलारे केलेल्या सर्वेक्षणाद्वारे आपले मत मांडताना म्हणाल्या, ‘स्वच्छतागृहांचे धोरण आणि महापालिका करीत असलेल्या उपाययोजना यांचा आढावा घेतल्यावर, त्यात त्रुटी असल्याचे जाणवते. तसेच न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणीही महापालिकेकडून होत नसल्याची दिसून आले आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी युवती काँग्रेसने हा प्रश्‍न हाती घेतला आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन अ‍ॅक्ट 1949 (चॅप्टर 6) नुसार आणि कलम 63 नुसार त्यांच्या अनिवार्य जबाबदार्‍या निश्‍चित करण्यात आल्या आहेत. या अधिनियामानुसार स्वच्छतागृहांबाबत महापालिकेने त्यांची कर्तव्ये पूर्ण करावीत असे नमूद केले आहे. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी अधिकार्‍यांच्या नियुक्त्या करून त्यांच्या जबाबदार्‍या निश्‍चित कराव्यात हे अपेक्षित असताना देखील पुणे महानगरपालिका आयुक्त व प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलेले आहे. ’
स्वच्छतागृहांअभावी युवती, महिलांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या निमंत्रक सुप्रिया सुळे यांनी हा प्रश्‍न मार्गी लावण्याचे ठरविले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील अनेक शहरांमध्ये आणि ग्रामीण भागांत महिला स्वच्छतागृहांबाबत जागरूकता निर्माण करून ती सुस्थितीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुण्यातही अनेक वर्षापासून शहराध्यक्ष व खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण यासाठी आग्रही आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवती काँग्रेस गेल्या चार वर्षांपासून ‘महिला स्वच्छतागृहे’ या विषयावर सक्रिय आहे.
महिला स्वच्छतागृहांबाबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर निर्णय देताना, न्यायालयाने स्वच्छतागृहांसाठी धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिकांना दिला.
शहरातील 17 लाख महिलांसाठी महापालिकेने शहराच्या विविध भागात 62 मुतार्‍या बांधल्या आहेत, असे प्रमाण शहरात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे 27 हजार 419 महिलांमागे एक मुतारी, असे प्रमाण शहरात असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र गेल 5 वर्षात फक्त महिलांसाठी 6 मुतार्‍या बांधण्यात आल्या आहेत. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एप्रिल 2016 रोजी विधानपरिषदेत केलेल्या निवेदनातून ही बाब स्पष्ट झाली आहे.
गर्दीच्या ठिकाणी 100 महिलांमागे एक मुतारी असावी व शहरांमध्ये मानांकनाप्रमाणे 35 ते 50 व्यक्तीमागे 1 शौचालय उपलब्ध असणे असे राष्ट्रीय निकष आहेत. तसेच सार्वजनिक आरोग्यासंदर्भात देखील प्रशासनाची कर्तव्य कायद्याने निश्‍चित केली असून, मात्र या गोष्टींना हरताळ फासला जात असल्यामुळे याबाबत राष्ट्रवादी युवती काँग्रेस सातत्याने पाठपुरावा करणार आहे. उपलब्ध महिला स्वच्छतागृहांमध्ये प्रामुख्याने पाणी, विज, साफसफाई, प्रशिक्षीत महिला सफाई कामगार यांची तरतुद असावी.’ प्रशासनाकडून अ‍ॅक्शन प्लॅन न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्ष मनाली भिलारे यांनी केला.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...