पुणे- नवीन शैक्षणिक धोरणात अभिप्रेत असणारे राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेची (एनसीसी) भूमिका महत्त्वाची ठरेल असा विश्वास एनसीसीच्या पुणे विभागाचे प्रमुख बि‘गेडियर डॉ. सुनील लिमये यांनी व्यक्त केला.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे (बीएमसीसी) माजी विद्यार्थी असणार्या डॉ. लिमये यांनी महाविद्यालयाला भेट दिली. प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. आशिष पुराणीक, डॉ. सुरेश वाघमारे, एनसीसीचे समन्वयक लेफ्टनंट यशोधन महाजन, आस्मा बागवान यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. लिमये पुढे म्हणाले, ‘देशांतर्गत असुरक्षित प्रसंगी नागरी संरक्षण व नागरी सेवकासाठी मोलाचे कार्य एनसीसी करीत असते. सैन्याविषयी आवड निर्माण करणारे उपक‘म राबविले जातात. देशाप्रती आदर, निष्ठा, प्रेम असलेले साहसी युवक घडविणे हे आमचे उद्दिष्ट आहे. त्यामुळेच नवीन शैक्षणिक धोरणात अभिप्रेत राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी एनसीसीची भूमिका महत्त्वाची ठरेल.’