नाना-नानी पार्कने सांगलीच्या वैभवात भर- खासदार शरद पवार

Date:

  सांगली, : जुन्या पिढीतील लोकांच्या विरंगुळ्यासाठी सांगली येथे तयार करण्यात आलेला नाना-नानी पार्क हा उत्कृष्ट प्रकल्प आहे. आर्थिकशैक्षणिकऔद्योगिक अशा सर्वच क्षेत्रात सांगली शहर बदलत चालले आहे. नागरिकांना सन्मान मिळावा यासाठी अशा प्रकारचे प्रकल्प घेण्याची जबाबदारी महापालिकेची असते. महानगरपालिकेने नाना-नानी पार्क हा चांगला उपक्रम हाती घेतला. या प्रकल्पासाठी मदत केलेल्या लोकप्रतिनिधींचे आभार मानून हा पार्क सांगलीच्या वैभवात भर घालणारा आहेअसे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार शरद पवार यांनी केले.

        रिलायन्स मॉल सांगली शेजारी उभारण्यात आलेल्या नाना-नानी पार्कचे लोकार्पण खासदार शरद पवार यांच्याहस्ते करण्यात आले आहे. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटीलसहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटीलखासदार श्रीनिवास पाटीलमहापौर दिग्वीजय सुर्यवंशीआमदार विद्याताई चव्हाणमहानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीसजिल्हा नियोजन समितीचे सदस्य संजय बजाजमहानगरपालिकेचे पदाधिकारीआजी व माजी नगरसेवकनागरिक उपस्थित होते.

        प्रास्ताविकात महापौर दिग्वीजय सुर्यवंशी यांनी नाना-नानी पार्क साठी अनेक लोकप्रतिनिधींनी मदत केल्याचे सांगून 1 कोटी 35 लाख रूपये खर्चून हा पार्क 27 गुंठे जागेत उभा केल्याचे सांगितले. तसेच या पार्कसाठी पालकमंत्री जयंत पाटील यांनी बांधकाम व इतर कामासाठी 51 लाखखासदार वंदना चव्हाण यांनी हॉलच्या बांधकामासाठी 25 लाखआमदार जगन्नाथ शिंदे यांनी नरगोला व ट्रॅकसाठी 10 लाखआमदार विद्याताई चव्हाण यांनी ॲम्पी थिएटर व परगोलासाठी 10 लाखआमदार ख्वाजा बॅगसो यांनी लाईट व्यवस्थेसाठी 5 लाख रूपयांचा निधी दिला असून कंपौंड वॉलसाठी डी.पी.डी.सी. निधी 34 लाख रूपये दिला असल्याचे सांगितले.

        या पार्कमध्ये बहुउद्देशीय हॉलउपासना केंद्रयोगासने व घ्यानधारणा केंद्रग्रंथालय व वाचनालयज्येष्ठ नागरिक विरूंगळा केंद्र अशा सोयीसुविंधा आहेत. यावेळी केपीटी मार्फत पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे ई-रिक्षासाठी मदत देण्यात आली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आषाढीवारी तयारीच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्याकडून पालखी मार्गाची पाहणी

▪️आषाढीवारीच्या काळात सर्व संबंधित विभागाने समन्वय ठेवून काम करावे-मुख्य...

२४ तासांत ०.१० टीएमसीची भर, साठा केवळ १२.९४ टक्केच

पुणे, दि. २ जुलै : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या...

विमानतळाच्या मेट्रो मार्गावर शिक्कामोर्तब; तर पौड फाटा ते वनदेवी होणार दुहेरी उड्डाणपूल !

‘निधी कमी पडू देणार नाही, तुम्ही मार्गांच्या रचना पुणेकरांच्या...

देहूतील इंद्रायणी घाटाचा चेहरामोहरा बदलणार; आषाढी वारीसाठी ‘पीएमआरडीए’ची युद्धपातळीवर तयारी!

महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडून कामाची प्रत्यक्ष पाहणी;...