भगवान साई झुलेलाल यांचा १०७२ वा जन्मोत्सव साजरा

Date:

पुणे : भगवान साई झुलेलाल यांची आरती… स्टॅन्ड अप कॉमेडियन मोहित शेवानी आणि सहकलाकारांचे बहारदार सादरीकरण… सिंधी गीतांच्या ऐकाव्याश्या वाटणाऱ्या चाली… कलात्मक नृत्य… चाट-सामोसा-गोड भाताचा प्रसाद… रुचकर लंगर… डोक्यावर लाल टोपी आणि झुलेलाल यांचे अखंड भजन यातून नववर्षाच्या सुरुवातीला सिंधी संस्कृतीचे दर्शन घडले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांनी होत असलेल्या या वार्षिक महोत्सवात सहभागी प्रत्येक सिंधी बंधू-भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

निमित्त होते, सिंधी समाजाच्या नववर्षाचे. भगवान साई झुलेलाल यांच्या १०७२ व्या जन्मोत्सवानिमित्त सिंधू सेवा दलातर्फे ‘चेटीचंड’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अल्पबचत भवनमध्ये झालेल्या या महोत्सवात संगीत, गायन, भजन आणि महाप्रसादातील विविध पदार्थ यामुळे चेटीचंड महोत्सव वैशिष्ट्यपूर्ण ठरला. यावेळी या कार्यक्रमात सिंधी समाजातील मान्यवर व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यामध्ये राम जवाहरानी, राजीव व राहुल कृष्णानी, परमानंद व अनुप जमतानी, डॉ. विभा व विजय वासवानी, कविष थकवानी, हितेश फेरवणी,आकाश दलवानी, निर्मल, धर्मेश व नीरज वाधवानी,विशाल चुगेरा,चंदन पारवणी यांचा समावेश होता. सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष पीटर दलवानी, ईश्वर कृपलानी, माजी अध्यक्ष  मनोहर फरवणी,सुरेश जेठवानी व दीपक वाधवानी, सचिव सचिन तलरेजा, जनसंपर्क अधिकारी किरण फेरवानी आदी उपस्थित होते. या महोत्सवात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील जवळपास तीन ते चार हजार सिंधी बांधव सहभागी झाले होते.

“सिंधी समाजाचा विकास करून समाजाच्या संस्कृतीविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे व सिंधू समाजाच्या परंपरा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचा आमचा मानस आहे. सिंधू सेवा दल गेली ३४ वर्ष कार्यरत आहे. चेटीचंड महोत्सवानिमित्त सर्व समाज एकत्र येतो. भगवान साई झुलेलाल यांचा उत्सव साजरा करतो. हा आनंदाचा क्षण अनुभवण्यासाठी आम्हीही दरवर्षी यामध्ये सहभागी होतो. यंदा जनरेशन नेक्स्ट डान्स अकँडमीतर्फे नृत्यकलेचे सादरीकरण आणि मोहीत शेवानी व मंजुश्री आसुदानी, शुभम नाथानी, अशोक सुंदरानी, करण खेमानी आदी कलाकार सहकार्‍यांचा लाईव्ह कार्यक्रम झाला,” असे पीटर दलवानी यांनी प्रास्ताविकात सांगितले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवसेना उबाठा पक्ष: पुण्यातील शहर नेतृत्वात फेरबदल होण्याचे संकेत

“संघटना हीच शिवसेनेची ताकद; पुण्यात ‘मिसिंग लिंक’ जोडण्याचे...

विद्यापीठ चौकातील पाणी गळती रोखण्याचे आदेश; बाणेर, हिंजवडीतील अडथळे दूर होणार!

मेट्रो-३ च्या कामासाठी 'पीएमआरडीए' 'ॲक्शन मोड'मध्ये; अतिरिक्त आयुक्तांकडून 'ग्राउंड...

‘फुलचंद पाना’तून नशेच्या गोळ्या

पुणे-पुणे पोलिसांनी 'फुलचंद पानात' नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर...

नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार

नव्या ६० केंद्रांना मंजुरी,ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२००...