दि. १३ आक्टोंबर – पेन्शनरांच्या छोट्याशा शहरापासून चहूबाजूने विस्तारणाऱ्या महानगरात रूपांतरित होताना पुण्यातील मोकळ्या जागा, मैदाने यांचा झालेला संकोच आणि रोजच्या कामाचे कमालीचे व्यग्र वेळापत्रक यांमुळे शारीरिक तुंदुरुस्तीची होत असलेली आबाळ कमी करण्यासाठी पुण्यात ट्रेंड निर्माण झाला आहे, तो खुल्या व्यायामशाळांचा अर्थात ‘ओपन जिम’चा. रस्त्यांच्या कडेला आणि सार्वजनिक मोकळ्या जागांत महापालिकेकडून उभारलेल्या ‘ओपन जिम’ना पुणेकरांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
नगरसेवक महेश वाबळे यांनी आपल्या प्रभाग क्रमांक ३५ मधील नटराज रेसिडंन्सीमध्ये सोसायटीच्या मोकळ्या जागेत ओपन जिम सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दरम्यान सोसायटीतीस ज्येष्ठ नागरिक व व्यायाम प्रेमींना शहरातील जिम, गार्डन बंद असल्याने एक्जरसाईज पासून वंचित राहावे लागत होते. नागरिकांची गरज आणि आवश्यकता लक्षात घेऊन नगरसेवक वाबळे यांनी नटराज रिसेडंन्सी मध्ये सुरू केलेल्या ओपन जिम चे उद्घाटन सोसायटी मधील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोसायटीमधील पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून मी नियमितपणे चालण्याचा व्यायाम करत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मी ‘ओपन जिम’मधील मशिनचाही वापर करत आहे ‘ओपन जिम’चा उपक्रम स्त्युत्य आहे. हलका व्यायाम करू इच्छिणाऱ्यांनी त्यांचा वापर करायला काहीच हरकत नाही;…. डॉ. विनय भोसले, पदाधिकारी नटराज रेसिडंन्सी, धनकवडी, पुणे
जाता-येता मोकळ्या हवेत सहजगत्या व्यायाम करण्याची सोय असल्याने अनेकांची पावले ‘ओपन जिम’कडे वळत असून, सोसायटीतील सभासदांना तंदुरुस्त ठेवण्यात या खुल्या व्यायामशाळा मोलाची भूमिका बजावत आहेत.- महेश वाबळे – नगरसेवक, पुणे मनपा, प्रभाग क्रमांक ३५.