पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आव्हानांला प्रतिसाद देत पुणेकरांनी 100%जनता कर्फ्यूला साथ दिली तसेच गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या महानगरपालिका आरोग्य अधिकारी, सहाय्यक आरोग्य अधिकारी,आपत्ती व्यवस्थापन ,सुरक्षा विभाग अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ हे आज नायडू हॉस्पिटला जाऊन आरोग्य सेवकांना गुलाबाचे फुल देऊन, टाळ्या वाजवून आभार मानले व सर्वाना धन्यवाद दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रविवारी सायंकाळी 5 वाजता पुणेकरांनी जोरदार टाळ्या, ताट, शिट्या वाजवून, शंखनाद करून प्रतिसाद दिला. यावेळी डॉकटर, नर्स, पोलिसांचे आभार मानण्यात आले.आपण एक आहोत .एकीची ताकद मोठी आहे हे आपण दाखवून दिले आहे असे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी म्हटले आहे .त्यांनी स्वतः कुटुंबासह थाळी वाजवून प्रतिसाद दिला .
लोक सध्या टेरेस आणि बाल्कनीत मोठ्या संख्येने जमले आहेत. रात्री 9 पर्यंत हा ‘जनता कर्फ्यु’ असला तरी त्यानंतरही पुणेकरांनी बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.